Saturday, May 4, 2024
Homeनगरशिक्षक संघाचा माध्यमिक लेखाधिकारी कार्यालयात ठिय्या

शिक्षक संघाचा माध्यमिक लेखाधिकारी कार्यालयात ठिय्या

वेतन निश्‍चितीसाठी शिक्षकांची एजंटांमार्फत आर्थिक लूट चालू असल्याचा आरोप

अहमदनगर (प्रतिनिधी) – सातव्या वेतन आयोगाच्या वेतन निश्‍चितीसाठी लेखाधिकारी कार्यालयाकडून शिक्षकांची एजंटांमार्फत आर्थिक लूट चालू असल्याचा आरोप करीत हा भ्रष्टाचार त्वरित थांबविण्याच्या मागणीसाठी नगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने लेखाधिकरी (माध्यमिक) कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्ह्यातील शिक्षक व विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

- Advertisement -

सातव्या वेतन आयोगाची वेतन निश्‍चिती करण्यासाठी लेखाधिकारी कार्यालयातील कनिष्ठ अधिकारी एजंटांमार्फत शिक्षकांकडून पैशाची मागणी करीत आहेत. यापूर्वी संघटनेने वेतन निश्‍चितीसाठी तालुकास्तरावर कॅम्प लावण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, कार्यालय याकडे दुर्लक्ष करीत असून, या भ्रष्टाचारात या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी सहभागी असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

सहाव्या वेतन आयोगाची वेतन निश्‍चिती करताना तालुकास्तरावर कॅम्प लावण्यात आले होते. त्या प्रमाणे तालुकास्तरावर कॅम्प लावावेत, शिक्षकांकडून एजंटामार्फत चालू असलेला पैसे उकळण्याचा भ्रष्टाचार त्वरित थांबवावा, अनेक वर्षापासून या कार्यालयात सेवेत असलेल्या सर्व कर्मचार्‍यांची बदली करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. लेखी आश्‍वासन मिळत नाही तो पर्यंत ठिय्या आंदोलन चालू ठेवण्याचा पवित्रा शिक्षकांनी यावेळी घेतला होता.

या आंदोलनात शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेंद्र लांडे, सरचिटणीस आप्पासाहेब शिंदे, राज्याध्यक्ष चांगदेव कडू, एम. एस. लगड, उध्दव गुंड, सुनील दानवे, बाळासाहेब निवडुंगे, शिरीष टेकाडे, रमाकांत दरेकर, आबासाहेब मुळे, महेंद्र हिंगे, अशोक सोनवणे, अमोल दहातोंडे, अर्जुन भुजबळ, शरद सोनवणे, योगेश मोरे, संजय साठे, महादेव भद्रे, विजय थोरात, सत्यनाथ शेळके, पारुनाथ ढोकळे, विठ्ठलप्रसाद तिवारी, सखाहरी खेडकर आदी सहभागी झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या