Thursday, May 23, 2024
Homeनगरथर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर शहरात आज नाकाबंदी

थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर शहरात आज नाकाबंदी

अहमदनगर (प्रतिनिधी) – थर्टी फर्स्टची जय्यत तयारी हॉटेल, क्लब, लॉन्समध्ये सुरू आहे. तर पोलिस प्रशासनाकडून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येत आहेत. नगर शहरात आज मंगळवारी 31 डिसेंबर पोलिसांची नाकाबंदी असणार आहे. या दरम्यान मद्यपान करून वाहने चालविणार्‍यांविरुद्ध मोठ्या प्रमाणात कारवाई करण्याचे नियोजन वाहतूक पोलिस, पोलिस स्टेशनच्या स्तरावर करण्यात आले आहे.

नगर शहरातून अनेक महामार्ग जातात. या महामार्गाला लागूनच हॉटेल, परमिट रूम आहेत. त्या ठिकाणी मद्यसेवन करून अनेक जण थेट महामार्गावरून वाहने घेऊन जातात. त्यामुळे महामार्गावरील चौकांमध्ये, अंतर्गत रस्त्यांमध्ये 30 डिसेंबरच्या रात्रीपासून नाकाबंदी करण्यात येत आहेत. दुसर्‍या दिवशी 31 डिसेबंरच्या दिवसभर व रात्री नाकाबंदी करण्यात येणार आहे.

- Advertisement -

तर मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाईसाठी कोतवाली, तोफखाना, भिंगार कॅम्प व वाहतूक पोलिस असे चार पथके रस्त्यावर असणार आहेत. महामार्गावरील सक्कर चौक, कायनेटिक चौक, प्रेमदान चौक, पत्रकार चौक, चांदणी चौक या भागात मद्यपान करून वाहने चालविणार्‍यांची तपासणी करण्यासाठी पथके असणार आहेत.

तीन पोलिस स्टेशनला तीन, तर वाहतूक पोलिस स्टेशनला एक अशी चार ब्रेथअ‍ॅनालयझर मशिन मद्यपींची चाचणी करण्यासाठी आहेत. त्याचबरोबर रस्त्यावर धिंगाणा घालणारे, रस्त्यावर डीजे लावणार्‍यांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. बेकायदा मद्यविक्री, उघड्यावर मद्यसेवन करणारे यांच्यावर पोलिस लक्ष ठेवून असणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या