Saturday, May 4, 2024
Homeनगरटाईम दर्शन पासेससाठीचे बायोमेट्रिक थंब बंद

टाईम दर्शन पासेससाठीचे बायोमेट्रिक थंब बंद

शिर्डी (शहर प्रतिनिधी) – कोरोना सारख्या उपद्रवी व्हायरसने जगात थैमान घातले असून राज्यात कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील नंबर एकचे तीर्थक्षेत्र असलेल्या साईबाबांच्या शिर्डीनगरीत खबरदारीचे उपाय म्हणून साईबाबा समाधी मंदिरात दर्शनासाठी टाईम दर्शन पासेससाठी बायोमेट्रिकद्वारे घेण्यात येणारे थंब बंद करण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे.

आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डीत देशविदेशांतील भाविक लाखोंच्या संख्येने येत असतात. या भाविकांना मंदिरात समाधी दर्शनासाठी बायोमेट्रिक टाईम स्लाँट दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी दरोरोज हजारो भाविकांना आपल्या हाताचे बोट ठेवून आपली ओळख द्यावी लागते. त्यामुळे कोरोनाचा प्रसार झपाट्याने होऊ शकतो. खबरदारीचा उपाय म्हणून साईबाबा संस्थानच्या वतीने बायोमेट्रीक थम पद्धत तातडीने बंद केली आहे. तसेच संस्थान कर्मचा-यांना हजेरीच्या ठिकाणी थम बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या