साप्ते (ता : त्र्यंबकेश्वर) : गिरणारे जवळील खाड्याची वाडी जवळील उतारावरून जात असताना टॅक्टरवरील ताबा सुटल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
- Advertisement -
चेतन देवराम चौधरी (३२) असे मृत युवकाचे नाव आहे. दि.१७ रोजी गिरणारे येथे ट्रॅक्टरचा फण आणण्यासाठी गेला होता. येथून चार वाजेच्या सुमारास परतत असताना कशप्पी धरणाजवळ खाड्याची वाडी जवळील उतारास त्याचा टॅक्टरवरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर पुलावरून खाली कोसळला. यात चेतन खाली दाबला गेल्याने त्याचा मृत्यू झाला.
तर त्याचा साथीदार धोंडीराम जाधव हा गंभीर जखमी असून त्यास आडगाव येथील मेडिकल कॉलेज या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे.
साप्ते येथील असलेला या युवकास एक मुलगी व दोन मुले असून त्याच्या जाण्याने गावावर शोक कळा पसरली आहे.
– देवचंद महाले