Tuesday, May 21, 2024
Homeनाशिकनवीन नाशकात दोघांच्या आत्महत्या

नवीन नाशकात दोघांच्या आत्महत्या

नाशिक : नवीन नाशिक परिसरात विविध ठिकाणी दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्रकार शनिवारी (दि.१६) घडले.

पवननगर येथील दुर्गा माता मंदिराजवळ राहणार्‍या वीस वर्षीय युवक निलेश विश्वास सोनवणे याने शनिवारी सांयकाळी सात वाजेपुर्वी राहत्या घरी छतास दोरी बांधून गळफास लावून घेतला.

- Advertisement -

तर कामठवाडे परिसरातील वावरेनगर परिसरातील शंकर रतन पवार (४७, रा. श्रीराम संकुल, वावरेनगर) यांनी शनिवारी दुपारी तीन च्या सुमारास राहते घरात बेडरूममध्ये फॅनला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

या दोन्ही प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या