Monday, November 25, 2024
Homeब्लॉगBlog | जागतिक पर्यावरण दिन : निसर्ग आणि लॉकडाऊन

Blog | जागतिक पर्यावरण दिन : निसर्ग आणि लॉकडाऊन

प्रत्येक वर्षी ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. पहिला जागतिक पर्यावरण दिन १९७२ मध्ये यूएन जनरल असेम्ब्लीनें स्टोकहोमच्या मानवी पर्यावरण ह्या विषयावरील परिषदेत ठरवला गेला. त्यानंतर १९७४ मध्ये पहिला जागतिक पर्यावरण दिवस ‘Only one Earth’ या विषयावर साजरा करण्यात आला. जगातील १४३ पेक्षाजास्त देशांमध्ये साजरा केला जातो. जगात युनायटेड नेशनतर्फे लोकांमध्ये पर्यावरणाची जागरूकता निर्माण करून तिचा प्रसार करण्यासाठी या दिवशी कार्यक्रम आयोजित केले जातात.

सजीव निर्जीव यांच्यातील क्रिया -प्रतिक्रिया आणि अंतरक्रिया यामधून साकार झालेली सजीवांच्या सभोवतालची परिस्थिती म्हणजे आपले पर्यावरण होय. पहिल्या महायुद्धानंतर मानवाच्या निसर्गावरील आघाताचे परिणाम शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. औद्योगिक क्रांतीमुळे त्याचे दूरगामी आणि गंभीर परिणाम माणसाला भेडसावू लागले. १९६० मध्ये पर्यावरण किंवा पर्यावरणशास्त्र हे विषय अभ्यासासाठी लागू करण्यात आले.

- Advertisement -

[series-matches series_id=”2425″]मानव पर्यावरणाचा महत्वाचा घटक आहे. मानवी हस्तक्षेप मोठ्या प्रमाणावर वाढले असून पर्यावरणीय पद्धतीचे शास्त्रीय पद्धतीने अध्ययन आणि यावर परिणामकारक उपाययोजना म्हणून पर्यावरणशास्त्र शिक्षणाला फार महत्व प्राप्त झाले आहे. हवा प्रदूषण , जलप्रदूषण, अती वाढती लोकसंख्या , जंगलतोड , हवामानबदल आणि जागतिक तापमानवाढ या घटकांचा आपल्या पर्यावरणावर परिणाम होताना दिसतो. पर्यावरणातील उपलब्ध घटकांचा मानवाने हव्यासापोटी मानव जास्त वापर करत आहे. यामुळे याचा परिणामामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. त्यामुळे भविष्यात गंभीर समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

२०२० जागतिक पर्यावरण दिवस कोलंबिया आणि जर्मनी यांच्या संयुक्त विद्यमाने जैवविविधता या विषयावर साजरा करण्याचे योजिले आहे. जैवविविधता किंवा बायोडायव्हरसिटी ( Biodiversity) म्हणजे पृथ्वीवरील सजीवांमध्ये आढळणारी विविधता होय. गेल्या वर्षी २०१९ मध्ये ‘हवेचे प्रदूषण’ हा विषय होता.

पर्यावरण आणि लॉकडाऊन
कोव्हीड १९ या जागतिक महामारीमुळे जगातील बहुसंख्य देश लॉकडाऊनमध्ये आहेत. लोक घरातच असून कारखाने काहीप्रमाणात बंद आहेत. हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत , कच्छपासून कामरूपपर्यंत भारतात एरव्ही श्वास घेण्यासही मुश्किल केलेल्या प्रदूषणाची पातळी भारतात सध्या लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे लक्षणीयरीत्या कमी झाली असून ओझोन लेयरमधे सुधारणा दिसत आहे.

निरभ्र आकाश आणि स्वछंद उडणारे पक्षी, स्वच्छ नद्या हे दृश्य अनेक शहरे आणि महानगरात पाहावयास मिळत आहे. भारतातील गंगा यमुना यांच्या पाण्याच्या गुणवत्तेत सुधारणा दिसत आहे. भारत आणि नेपाळ मधील हवेची गुणवत्ता सुधारल्यामुळे काठमांडूमधून हिमालय आता स्वच्छ दिसू लागला आहे.

लॉकडाऊन काळात पर्यावरणावर सकारात्मक बदल घडून आला आहे. इटलीच्या समुद्रात डॉल्फिन दिसला, भारतात मोर, बिबट्या यांचे शहरांमध्ये आगमन होत असून, पशु पक्षांचा किलबिलाट ऐकू येत आहे . पृथ्वीसाठी करोना जणू संजीवनी बनून आला आहे. मात्र लॉकडाऊन नंतर हवेच्या आणि पाण्याच्या प्रदूषणाची वाढ रोखण्यासाठी आणि त्याच्या सकारात्मक परिणामांसाठी दीर्घकाळ उपाय करण्याची गरज आहे. यामुळे निसर्ग ओरबाडणाऱ्या मानवाने याकडे संधी म्हणून बघून योग्य उपाय योजले पाहिजे.

सलिल परांजपे, देशदूत नाशिक

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या