Sunday, November 17, 2024
Homeमुख्य बातम्या३१ डिसेंबर पासून तुमचं व्हॉट्सअँप बंद होणार; जाणून घ्या कारण

३१ डिसेंबर पासून तुमचं व्हॉट्सअँप बंद होणार; जाणून घ्या कारण

मुंबई : व्हॉट्सअँप युजर्ससाठी वाईट बातमी असून येत्या ३१ डिसेंबर पासून काही स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअँप बंद होणार आहे.

दरम्यान देशभरात व्हाट्सएपच्या युझरची संख्या अफलातून आहे. त्यामुळे या व्हाट्सअँपचे फिचर सतत बदलत असतात. आता नुकतेच व्हाट्सअँपने जाहीर केले आहे कि, विंडोज स्मार्टफोनचा वापर करणाऱ्या युजर्सला नव्या वर्षात मध्ये व्हॉट्सअँप वापरता येणार नाही आहे. यापूर्वी व्हॉट्सअँपने याबाबत ०१ जुलै पासून विंडोच स्मार्टफोनमध्ये या संबंधित अपडेट देणे बंद केले आहे.

- Advertisement -

व्हॉट्सअँपने iOS युजर्ससाठी एक नवे बीटा अपडेट 2.20.10.23 आणले आहे. काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सअँपने विंडोज स्मार्टफोन युजर्सला असे सांगितले की, जर तुम्हाला कोणत्याही अडथळ्याशिवाय याअँपचा वापर करायचा असल्यास नवा स्मार्टफोन खरेदी करावा लागणार आहे. त्यामुळे ३१ डिसेंबर पासून विंडोज स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप काम करणे बंद करणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या