Thursday, May 23, 2024
Homeमहाराष्ट्रMaratha Andolan: जालन्यातील घटनेप्रकरणी ३५० मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल; पोलिसांना जीवे मारण्याचा...

Maratha Andolan: जालन्यातील घटनेप्रकरणी ३५० मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल; पोलिसांना जीवे मारण्याचा कट रचल्याचा आरोप

जालना | Jalana

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालनामध्ये आंतरवाली सराटा गावात चार दिवसांपासून शांततेत उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर काल (शुक्रवारी) पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. त्याचे संतप्त पडसाद आता राज्यभरात उमटताना दिसत आहेत. तर मराठा समाज ठिकठिकाणी रस्त्यावर उतरत आहे. या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण तापलं आहे. अशातच एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरूवात केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत एकूण ३०० ते ३५० अज्ञात लोकांवरतीही गुन्हे दाखल केले आहे. तर काही ठिकाणी आंदोलकांना ताब्यात देखील घेतलं आहे. जालन्यातील गोंदी पोलीस स्थानकात कलम ३०७ आणि ३३३ अंतर्गत या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. सार्वजनिक मालमत्तेलचे नुकसान करणे, जाळपोळ तसेच दगडफेक करणे, अशा गुन्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान, हे गुन्हे दाखल केलेल्या अज्ञात व्यक्तींची संख्या आणखीच वाढू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Maratha Andolan : जालन्यातील घटनेचे राज्यभरात पडसाद! कुठे तणाव, तर कुठे आंदोलन

फिर्यादीत काय म्हटले

याप्रकरणी गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश राऊत यांनी फिर्याद दिली. त्यांनी फिर्यादित म्हटले की, काल 1 सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन ते सायंकाळी सव्वा सातेच्या दरम्यान, अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आमरण उपोषणास बसलेले असताना मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली. त्यांना उपचाराची आवश्यकता असल्याने वैद्यकीय अधिकारी यांनी सुचवल्याने आम्ही पोलीस अधिकारी सदर ठिकाणी गेले आणि आंदोलनकर्त्यांना समजाऊन सांगितले. मात्र, त्यांनी आमच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करुन मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही मनोज जरांगे यांना आमरण उपोषण सोडू देणार नाही, असे म्हणून पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार आणि महसूल अधिकारी यांच्यासोबत हुज्जत घालून दंडाधिकारी आणि पोलिसांनी दिलेल्या कायदेशीर आदेशाचे पालन न करता पोलिसांना जीवे ठार मारण्याचा कट करुन आणि तो उद्देश्य साध्य करण्यासाठी पोलिसांवर दगडफेक केली आणि पोलिसांना गंभीर जखमी केले. तसेच पोलीस वाहनावरही दगडफेक केली आणि पोलिसांची खासगी कार जाळून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले, असे फिर्यादित म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एकशिंगे हे करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या