Monday, July 22, 2024
HomeनाशिकVideo : 'डेझर्टिनो' आता नाशकात; एकाच छताखाली मिळणार आंतरराष्ट्रीय पदार्थांची चव

Video : ‘डेझर्टिनो’ आता नाशकात; एकाच छताखाली मिळणार आंतरराष्ट्रीय पदार्थांची चव

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

कोणतेही कृत्रिम फ्लेवर्स नसलेला शुद्ध शाकाहारी घटक वापरलेला दुबईचा प्रसिद्ध ब्रँड १५ वर्षापासून जगभरातील खवय्यांच्या जिभेवर रुळणारे नाव ‘डेझर्टिनो’ आता नाशिक शहरात आला आहे. शॉप नं. २, गणेश गुंजन अपार्टमेंट, लवाटे नगर, सिटी सेंटर मॉलजवळ, उंटवाडी येथे डेजर्टिनोच्या शाखेचे उदघाटन आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते दिमाखात पार पडले…

पिझ्झा, आइस्क्रिम, मिल्क शेक हे पदार्थ एकाच छताखाली येथे उपलब्ध आहेत. शेखर जगताप आणि रविंद्र टेकाळे यांनी डेझर्टिनोची शाखा नाशिककरांच्या सेवेत आणली आहे. शुद्ध शाकाहारी, ताजे आणि उच्च दर्जाचे घटक, कोणतेही कृत्रिम फ्लेवर्स येथे वापरले जात नाहीत.

‘त्या’ याचिकेवर राहुल गांधींना दिलासा देण्यास गुजरात हायकोर्टाचा नकार

स्वच्छतेची सर्वोच्च संभाव्य मानके राखत ग्राहकांना आंतराष्ट्रीय डेझर्टस, व इतर पदार्थांचा स्वाद नाशकात उपलब्ध करून देण्यात आला आहे. नाशिककरांनी एकदा तरी येथे भेट देऊन अनोख्या खाद्यपदार्थांची चव चाखावी असे आवाहन संचालकांनी केले आहे. यावेळी कंपनीचे संस्थापक अध्यक्ष भावेश चेलानी, सुनील चेलानी आदी मान्यवर उपस्थित होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Sharad Pawar Resigns : साहेबच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष! नाशिकचे कार्यकर्ते झाले भावूक

कामानिमित्त बडोदा येथे जातांना डेझर्टिनोच्या दालनात गेलो असता तेथे थिक शेक, आणि इतर खाद्य पदार्थांची चव मनाला भावली. आणि नाशिकमध्ये डेझर्टिनोची शाखा उघडण्याचा विचार पहिल्यांदा मनात आला. विशिष्ट पदार्थाची चव चाखण्यासाठी त्या त्या ब्रँड्सच्या शाखेत जाण्याची आता गरज नसून, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विविध पदार्थ एकाच ठिकाणी उपलब्ध झाले आहेत.

– रवींद्र टेकाळे.

इटालियन व्हेज पदार्थ, आईस्क्रीम, पिज्जा, अशा विविध आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या पदार्थांची अनोखी चव एकाच ठिकाणी डेझर्टिनोमध्ये उपलब्ध झाली आहे. येथे विविध प्रकारचे थिक शेक, मिल्क शेक, आइस्क्रिम असे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. नाशिककरांनी एकदा तरी येथे आवर्जून भेट देवून त्याची अनुभूती घ्यावी.

– शेखर जगताप

- Advertisment -

ताज्या बातम्या