Saturday, July 27, 2024
Homeनाशिककौशल्य विकास उपक्रमाचे आयोजन

कौशल्य विकास उपक्रमाचे आयोजन

सातपूर । प्रतिनिधी Satpur

क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे बांधकाम क्षेत्रात काम करणार्‍या कामगारांसाठीच्या कौशल्य विकास करणार्‍या उपक्रमाचा शुभारंभ राष्ट्रीय क्रेडाईचे सल्लागार जितूभाई ठक्कर यांच्या हस्ते करण्यात आला.

- Advertisement -

या उपक्रमांतर्गत क्रेडाई सभासदांच्या विविध बांधकाम साईटवर काम करणार्‍या कामगारांना एका महिन्याचे प्रशिक्षण तज्ज्ञांकडून दिले जाईल. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रीय क्रेडाईतर्फे प्रशस्तीपत्रक व विद्यावेतन देण्यात येणार असल्याची माहिती क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवी महाजन यांनी दिली.

बांधकामाच्या दर्जामध्ये तेथे काम करणार्‍या कामगारांचा मोठा वाटा असतो. या कामगारांना बांधकामाशी निगडित प्लास्टरिंग, प्लंबिंग, इलेक्ट्रिफिकेशन, सेंट्रींग अशा व अनेक बाबींचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येईल.

या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी इपिक व पंजाब नॅशनल बँक यांचे सहकार्य लाभले असून 30 कामगारांच्या विविध बॅचेसमध्ये शहरातील बांधकाम साइटवर प्रशिक्षण देणार आहे.

या सोबतच पॅॅन कार्ड, आधार कार्ड, बँक अकाउंटसाठी मार्गदर्शन व सहाय्यता देण्यात येणार असून या कामगारांना झिरो बॅलन्स अकाउंट उघडता यावे यासाठी क्रेडाई महाराष्ट्रतर्फे इंडियन पोस्ट बँक सोबत करार देखील करण्यात आला असल्याचेही रवी महाजन यांनी सांगितले.

प्रशिक्षणाचा शुभारंभ पाटील-शहा असोसिएशनच्या साइटवर करण्यात आला. या कार्यक्रमास क्रेडाईचे सचिव गौरव ठक्कर, सचिन बागड, सुशील बागड, हंसराज देशमुख, विजय चव्हाणके, राजेश आहेर, अनंत ठाकरे, सागर शहा, मनोज खिंवसरा, अतुल शिंदे, नितीन पाटील व इपिकचे संदीप कुयटे उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या