Friday, May 3, 2024
Homeनंदुरबारनंदुरबार येथे दोन मोबाईल मेडिकल युनिटच्या वाहनाचा शुभारंभ

नंदुरबार येथे दोन मोबाईल मेडिकल युनिटच्या वाहनाचा शुभारंभ

नंदुरबार । Nandurbar । प्रतिनिधी

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (National Health Campaigns) धडगाव व तळोदा येथील अतिदुर्गम (remote areas) भागातील नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी (Health care to citizen) दोन मोबाईल मेडिकल युनिट (Mobile Medical Unit) (फिरते रुग्णालय सेवा ) च्या वाहनाचा (vehicles) शुभारंभ खा.डॉ.हिना गावीत यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.

- Advertisement -

जिल्हा परिषद, नंदुरबार येथे झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जि.प.उपाध्यक्ष राम रघुवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, जिल्हा कार्यक्रम अधिकारी कृष्णा राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.चारुदत्त शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गोविंद चौधरी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हरीचंद कोकणी, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.एन.एन.बावा, वैद्यकीय अधिकारी डॉ.राठोड, आर.डब्ल्यू प्रमोशनचे मॅनेजर शशिकांत सोनी, जिल्हा समन्वयक निलेश शर्मा तसेच जिल्हा परिषदेतील अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.

या मोबाईल युनिट वाहनामार्फत धडगाव व तळोदा तालुक्यातील दुर्गम भागात ज्या ठिकाणी आरोग्य सेवा पोहचत नाही अशा ठिकाणी ह्या मोबाईल युनिटच्या मार्फत रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी, 0 ते 6 वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी, गरोदर व स्तनदामाता तपासणी, साथजन्य परिस्थितीतील उपचार, सिकलसेल, नेमिया, रक्त,लघवी तपासणी तसेच आरोग्य विषयक समुपदेशन व उपचार या मोबाईल युनिटच्या मार्फत करण्यात येणार आहे. तसेच तपासणी करतांना जोखीमग्रस्त रुग्ण आढळून आल्यास त्यांना त्वरीत पुढील उपचारासाठी आरोग्य केंद्र किंवा उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे. या मोबाईल युनिट वाहनात एक वैद्यकीय अधिकारी, एक परिचारीका, एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एक फॉर्मासिस्ट, वाहनचालक असे कर्मचारी वर्ग या युनिटमध्ये राहणार असून त्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या