Saturday, April 26, 2025
Homeनाशिकत्र्यंबकला पाणीदार करण्यासाठी एकत्र या..!

त्र्यंबकला पाणीदार करण्यासाठी एकत्र या..!

वेळुंजे | Velunje

पावसाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या त्र्यंबक तालुका उन्हाळ्यात उन्हाळ्यात मात्र दाहीदिशा भटकत असतो.

- Advertisement -

त्यामुळे आता खरी गरज आहे ती जनतेला मुबलक पाणी पिण्यासाठी देण्याची, असे प्रतिपादन आमदार खोसकर यांनी केले. माळेगाव दिव्याचा पाडा येथील पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.

प्रत्येक गावातील नळ पाणी पुरवठा योजनेची कामे दर्जेदार झाली पाहिजेत, त्याशिवाय त्र्यंबक तालुका पाणीदार होणार नाही. स्वतः साठी नाही तर किमान पाण्यासाठी लोकांनी आता एकत्र यायला हवे,

यासाठी गाव पातळीवरील ज्या पाणी पुरवठ्याच्या योजना मंजूर होत असतांना त्यासाठी गावातील लोकांनी गावातील राजकारण व गट तट विसरून ग्रामस्थ व लोकप्रतिनिधीनी एकत्र येऊन याकडे लक्ष दिले पाहिजे, असे ठासून मत आमदार हिरामण खोसकर सांगितले.

या वेळी सभापती मा.मोतीराम दिवे, सरपंच तानाजी दिवे, आनंदा कसबे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...