Sunday, September 15, 2024
Homeनाशिककायदा, सुव्यवस्था अबाधीत रहावी

कायदा, सुव्यवस्था अबाधीत रहावी

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

- Advertisement -

प्रत्येक पोलिस ठाण्यात जनता दरबार भरविण्याचे आयुक्त दिपक पांडे यांनी जाहीर केले होते.

उपनगर पोलिस ठाण्याला नवीन जागा देऊन पोलिसबळ वाढवावे, बेकायदेशीर दारु विक्री, अवैध धंदे रोखावे, गँगवार रोखावे, गार्डनमध्ये नशापाणी करणार्‍यांवर तसेच शालेय मुलांना अंमलीपदार्थांचे व्यसन लावणार्‍यांवर कारवाई करावी, समाजमंदिरातील टवाळखोरी, गैरप्रकार थांबवावेत, बालगुन्हेगारी रोखावी, गुंडांना तडीपार करावे आदी मागण्या नागरिक व लोकप्रतिनिधींनी उपनगर पोलिस ठाण्यातील जनता दरबारात केल्या.

आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रत्येक पोलिस ठाण्यात जनता दरबार भरविण्याचे दिपक पांडे यांनी जाहीर केले होते. उपनगर पोलिस ठाण्यात त्यांनी बैठक घेतली. यावेळी रस्त्यावर वाढदिवसाचा केक कापून हैदोस घालणार्‍यांवर थेट लाठीमार करणार असल्याचे पोलिस आयुक्त दिपक पांडे यांनी स्पष्ट केले.

मास्क न घालणे, सामाजिक अंतर न पाळणे, दुकांनापुढे गर्दी करणे, रस्त्यावर थुंकणे याबाबत शहरात तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. शहरात गँगवार करणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल. बाल गुन्हेगारी, गार्डनमध्ये नशापाणी, चेन स्नॅचिंग, अवैध धंदे आदींबाबत तातडीने उपाययोजना केली जाईल. जसा आजार तसे औषध असेल. प्रत्येक शनिवारी आपण एका पोलिस ठाण्याला भेट देऊ.

उपनगर पोलिस ठाण्याला नवीन जागा देऊन पोलिसबळ वाढवावे, बेकायदेशीर दारु विक्री, अवैध धंदे रोखावे अशी सूचना नगरसेवक राहुल दिवे यांनी केली. गार्डनमध्ये नशा करणार्‍यांवर कारवाई करावी, अवजड वाहतूक तपोवन मार्गे वळवावी अशी मागणी आशा तडवी यांनी केली. गँगवार, चेनस्नॅचिंगचे प्रकार रोखण्यासाठी पोलिस बळ वाढविण्याची सूचना प्रशांत दिवे यांनी केली. सुनंदा मोरे यांनी अवैध दारु विक्रेत्यांवर कारवाईची मागणी केली.

शालेय मुलांना अंमलीपदार्थांचे व्यसन लावणार्‍यांवर कारवाई करावी, समाजमंदिरातील टवाळखोरी, गैरप्रकार थांबवावेत, बालगुन्हेगारी रोखावी, गुंडांना तडीपार करावे, पोलिस खबर्‍यांची संख्या वाढवावी आदी मागण्या करण्यात आल्या.

याप्रसंगी नगरसेवक दिनकर आढाव, जगदीश पवार, आशा तडवी, प्रशांत दिवे, राहुल दिवे, ज्योती खोले तसेच संजय भालेराव, बंटी कोरडे, शिवाजी हांडोरे, महेंद्र अहिरे, नवनाथ ढगे, प्रकाश बागूल, शाम गोहाड, बाळासाहेब शिंदे, प्रमोद पगारे, गणेश सातभाई, किशोर कटारे आदी उपस्थित होते. पोलिस निरीक्षक सुनील रोहोकले यांनी स्वागत तर उपायुक्त विजय खरात यांनी प्रास्तविक केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या