Friday, June 14, 2024
Homeमुख्य बातम्याGunratna Sadavarte : वकील गुणरत्न सदावर्तेंच्या गाड्यांची तोडफोड; मनोज जरांगे पाटलांच्या अटकेची...

Gunratna Sadavarte : वकील गुणरत्न सदावर्तेंच्या गाड्यांची तोडफोड; मनोज जरांगे पाटलांच्या अटकेची केली मागणी

मुंबई | Mumbai

- Advertisement -

वकील गुणरत्न सदावर्ते (Advocate Gunaratna Sadavarte) यांच्या गाड्यांची आज सकाळी साडेसहाच्या सुमारास काही अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली. सदावर्तेंच्या परळ (Paral) येथील घराबाहेर त्यांची गाडी उभी होती. तिथेच त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले आहे. या तोडफोडीनंतर गुणरत्न सदावर्ते यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत मराठा आरक्षण आंदोलनातील नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या अटकेची मागणी केली आहे…

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात पुणे पोलिसांकडून नाशिकच्या सराफ व्यावसायिकाला अटक

यावेळी बोलतांना सदावर्ते म्हणाले की, “हल्लेखोरांना आणि मनोज जरांगेंना आज मला प्रश्न विचारायचा आहे की, तुमच्या शांततामय आंदोलनाची हीच व्याख्या आहे का? मला गप्प केलं जाऊ शकत नाही. माझा लढा या देशातील ५० टक्के खुल्या जागा वाचवण्याचा आहे. या देशाला जातीपातीत तोडलं जाऊ नये यासाठी माझा लढा आहे. माझ्या कष्टाच्या आणि घामाच्या कमाईचे त्यांनी नुकसान केले आहे. त्यांनी यापूर्वी ३२ कर्मचाऱ्यांना विनाकारण मारहाण (Beating) केली. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांवर कारण नसताना कारवाई करण्यात आली. मला अनेक प्रकारच्या धमक्या दिल्या जात होत्या,” असा आरोप गुणरत्न सदावर्तेंनी केला.

सदावर्ते पुढे म्हणाले की, “माझी मुलगी झेन मागील ८ दिवसांपासून शाळेत जात नाही. कारण झेन आणि जयश्री पाटील (Jayshree Patil) यांना मारण्याच्या आणि उचलून नेण्यापर्यंतच्या धमक्या आहेत. सामान्यांच्या ५० टक्के जागा वाचवत असल्याने आम्हाला त्रास दिला जाईल, आमच्यावर हल्ले होतील, अशा धमक्या स्पष्टपणे दिल्या जात होत्या. तसेच मला हिंदुराष्ट्र भारतातील सर्वांना सांगायचं आहे की, आता वेळ आली आहे. या जातीपाती करून या देशातील विचाराचे आणि गुणवत्तेचे तुकडे केले जाऊ शकतात. हे तुकडे होऊ नये, गुणवंत सुरक्षित राहावेत म्हणून मी लढा देईन. माझी हत्या झाली तरी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी गुणवतांसाठीचा लढा चालू ठेवीन”, असे सदावर्ते यांनी म्हटले आहे.

पुढे बोलतांना सदावर्ते म्हणाले की, “मी जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना भेटलो तेव्हा त्यांनी स्वतः माझ्यासमोर संयुक्त पोलीस आयुक्तांना फोन कॉल केला होता. त्यानंतरही कॅबिनेट मंत्र्यांना माझ्यासमोर डीसीपी चिमटे यांना फोन कॉल केला होता. हे सांगण्याचं कारण म्हणजे माझ्यावर हल्ला होईल याबाबत पोलिसांनाही माहिती होती. त्यांनी पोलिसांच्या समक्ष हल्ला केला, गाड्यांची तोडफोड केली. ते माझ्या घरातही येण्याचा प्रयत्न करत होते”, असंही पोलिसांनी (Police) मला सांगितल्याचे सदावर्ते यांनी म्हटले आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचं निधन

- Advertisment -

ताज्या बातम्या