Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजहाके-पंडीत समर्थकांचा गेवराईत राडा; लक्ष्मण हाकेंसह १४ जणांवर गुन्हे दाखल

हाके-पंडीत समर्थकांचा गेवराईत राडा; लक्ष्मण हाकेंसह १४ जणांवर गुन्हे दाखल

बीड | Beed
बीडच्या गेवराई शहरात दोन गटांमध्ये झालेल्या राडा प्रकरणाने खळबळ उडाली. या प्रकरणी लक्ष्मण हाके यांच्यासह तब्बल १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गटातील समर्थकांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून गेवराई पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. गेवराईमध्ये लक्ष्मण हाके आणि विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्त्ये सोमवारी एकमेकांना भिडले. दिवसभर गेवराईत जोरदार राडा झाला. त्यानंतर पोलिसांनी सुमोटो कायद्यानुसार लक्ष्मण हाकेंसह १४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

गेवराई शहरात काल (सोमवारी) दोन गट आमने-सामने आले. परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी पूर्वीच लक्ष्मण हाके यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावली होती. मात्र, त्यानंतरही हाके गेवराईत उपस्थित राहिल्याने दोन्ही गटातील वाद वाढला आणि वातावरण तणावपूर्ण बनले. लक्ष्मण हाके यांच्या अंगावर आमदार विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांकडून चपला भिरकवण्यात आल्या होत्या तर लक्ष्मण हाके यांच्या समर्थकांकडून गाडीवरती उभारून दांडके दाखवण्यात आले होते. त्यानंतर आज पोलिसांनी सुमोटोनुसार 14 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचाही सहभाग आहे.

- Advertisement -

लक्ष्मण हाकेंवर गुन्हा दाखल
या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत लक्ष्मण हाके यांच्यासह १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. दोन्ही गटातील समर्थकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत गोंधळ घातल्याने कायदा-सुव्यवस्था बिघडली होती. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही गटांवरही कारवाई केली आहे. दरम्यान, या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

YouTube video player

बीडच्या गेवराई तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांमध्ये राडा झाला. लक्ष्मण हाके यांच्या अंगावरती चपला आणि दगडफेक करण्यात आली तर लक्ष्मण हाके यांच्या समर्थकांकडून देखील दांडके दाखवण्यात आले. राड्यानंतर पोलीस अधिक्षकांनी सीसीटीव्ही फुटेच्या आधारे तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत, असे आदेश संबंधित पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांना दिले. पोलिसांनी त्यानंतर १४ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Shirdi : शिर्डीत भाविकांची लूट करणार्‍या एजंटांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi साईनगरीत दर्शनासाठी येणार्‍या लाखो भाविकांची (Devotee) अडवणूक करून त्यांची आर्थिक पिळवणूक करणार्‍या एजंटांच्या (Agent) मुसक्या आवळण्यासाठी प्रशासनाने आता कंबर कसली आहे. भाविकांची...