Friday, September 4, 2026
Homeक्राईमCrime News : एलसीबीची जुगार व अवैध दारू अड्ड्यांवर छापेमारी

Crime News : एलसीबीची जुगार व अवैध दारू अड्ड्यांवर छापेमारी

33 संशयितांना पकडले || साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

- Advertisement -

जिल्ह्यातील जुगार व अवैध दारू व्यवसायाविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) रविवारी (5 जुलै) धडक कारवाई करत नेवासा, अहिल्यानगर तालुका, राहाता आणि लोणी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाच दिवशी पाच ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत एकूण पाच गुन्हे दाखल करण्यात आले असून 33 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच 6 लाख 59 हजार 5 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाईचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले आहेत. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे, विकास जाधव, कृष्णकुमार सेदवाड, महादेव गुट्टे यांच्यासह पोलीस अंमलदारांची स्वतंत्र पथके तयार करण्यात आली. या पथकांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे विविध ठिकाणी एकाच वेळी छापे टाकून ही कारवाई केली.
नेवासा पोलीस ठाण्यात अलिम शकील शेख, सतीष नानासाहेब भागवत, जालिंदर उत्तम खरात, विठ्ठल सुरेश पवार, राहुल मिनीनाथ कवडे, प्रशांत कैलास गायके, प्रकाश बाळासाहेब जाधव, आकाश रावसाहेब पारखे, गणेश दत्तात्रय पवार व राहुल मिनीनाथ कवडे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध दारू विक्री व जुगार अड्ड्यावर केलेल्या छापेमारीप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. दारूविक्री प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात सुरज नारद पंडित व सोमनाथ सुनील जगदाळे यांच्याविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

राहाता पोलीस ठाणे हद्दीत जुगारावर केलेल्या कारवाईप्रकरणी अशोक तुकाराम सोनवणे, अंज्याबापु किसन त्रिभुवन, संजय शिवराम जेजुरकर, निसार कादरभाई शेख, भागवत किसन त्रिभुवन, उस्मान ईब्राहिम पठाण, लक्ष्मण गोविंद गायकवाड, अरूण साहेबराव वर्पे, मुन्नावर इब्राहिम शेख, राजेंद्र किसन पोटे, गोकुळ सोन्याबापु गाडेकर, सोपान बबन लहामगे व संजय कचरू राऊत यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, लोणी पोलीस ठाणे हद्दीत जुगारावर केलेल्या कारवाईप्रकरणी नईम सलीम सय्यद, कासाम मकबुल शेख, दगडु सखाराम बोरूडे, इरफान अहमद शेख, अमजद रशिद शेख, नवाज महंमद शेख, अनिस सांडू पठाण, जुल्फकार शकील शेख, मोहनराज नारायण बोरूडे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Nashik APMC News : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची १४ बँक...

0
पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati जमीन संपादनाच्या वाढीव मोबदल्यापोटी थकीत असणारी तब्बल ₹३६ कोटी ५२ लाख ६३ हजार ९० रुपयांची रक्कम जमा न केल्याने नाशिकच्या...