धुळे dhule । प्रतिनिधी
जळगावसह बुलढाणा आणि शिरपूर घरफोडी, चोरी करणार्या अट्टल चोरट्याला (staunch thief) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (local crime branch team) शेंदुर्णीतून जेरबंद केले (arrested). त्याच्याकडून दुचाकीसह सव्वा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याबाबत पोलिस अधिक्षक संजय बारकुंड यांनी पत्रपरिषदेत माहिती दिली.
Big Breaking # 2000 रूपयांच्या नोटेबाबत आरबीआयने घेतला मोठा निर्णय… वाचाच अन्यथा होऊ शकते नुकसान
शिरपूरातील करवंद रोडवरील शकुंतला लॉन्स समोर राहणारे चंद्रकांत साहेबराव पाटील यांच्याकडे दि.15 मे रोजी भरदिवसा घरफोडी झाली. चोरट्यांनी घरातून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 74 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी शिरपुर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा समांतर तपास स्थानीक गुन्हे शाखेकडुन सुरू असतांना पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना तात्रीक विष्लेषणाव्दारे हा गुन्हा संदीप अर्जुन गुजर (रा. शेदुर्णी, ता. जामनेर, जि.जळगाव) याने केल्याची माहिती मिळाली.
रेल्वे प्रवाशांनो हुतात्मा एक्सप्रेसने प्रवासाचे नियोजन करू नका… कारण..
त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने शेदुर्णी येथून आज दि. 19 रोजी संदीप गुजर यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देवुन गुन्हा करण्यासाठी वापरलेलेल्या दुचाकीसह मुद्देमाल काढून दिला. त्यांच्याकडून 40 हजारांची विना नंबर प्लेटची दुचाकीसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकुण 1 लाख 21 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
VISUAL STORY : गळ्यात नको ते घालून उर्वशी रौतेलाने केला कहरदोन दिवसात फुकट्या प्रवाशांकडून दोन लाख 98 हजारांचा दंड वसुल
जप्त करण्यात दुचाकीबाबत खात्री केली असता देवळगाव राजा पोलीस स्टेशन (जि. बुलढाणा) येथे चोरीचा गुन्हा दाखल आहे. आरोपीला पुढील तपासासाठी शिरपुर शहर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.
वरणगाव फॅक्टरीत वाढत्या तापमानामुळे भीषण आगशस्त्रांसह दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीचा पर्दाफाश
ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, कनिष्ठ तज्ञ, सपोनी योगेंद्रसिंग राजपुत, पोसई योगेश राऊत, असई धनंजय मोरे, पोलिस हवालदार श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, पोना मायुस सोनवणे, मनोज ब्राम्हणे, पोलिस शिपाई कमलेश सुर्यवंशी, राहुल गिरी, चालक कैलास महाजन, राजेश गिते यांच्या पथकाने केली.
दोन वर्षात ३८ मातांचा प्रसुतीदरम्यान मृत्यू