Monday, November 25, 2024
Homeधुळेदेवपूरातील अवैध मिनी गॅस पंपावर एलसीबीचा छापा

देवपूरातील अवैध मिनी गॅस पंपावर एलसीबीचा छापा

धुळे । dhule प्रतिनिधी

शहरातील देवपूर भागातील प्रोफेसर कॉलनीत अवैध व धोकेदायरित्या (Illegally and dangerously) सुरू असलेल्या मिनी गॅस पंपावर (mini gas pump) एलसीबीच्या (team of LCB) पथकाने छापा (raiding) टाकत कारवाई (action) केली. तेथून दोन जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून व्हॅन, 38 गॅस सिलींडरसह अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी हरी ओम गॅस एजन्सी मालकासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

प्रोफेसर कॉलनीत गिरीष ऊर्फ बबलु पांडुरंग चौधरी हा त्याने कामावर ठेवलेल्या लोकांकडुन त्याच्या राहत्या घरात घरगुती सिलेंडरचा बेकायदेशीर साठा करुन घराच्या मागील बाजुस असलेल्या मोकळया जागेत बेकायदेशिररित्या घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस वाहनात इंधन म्हणुन भरुन देत असल्याची खात्रीशीर माहिती आज दि. 22 रोजी एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीच्या पथकाने गिरीष चौधरी याच्या घरावर छापा टाकला. तेथे कामगार प्रदीप रुपचंद सुर्यवंशी (रा.विष्णु नगर, भतवाल टॉकीज जवळ, देवपुर) हा ओमिनी वाहनात (क्र.एम.एच. 18 डब्ल्यु 0573) गॅस भरतांना मिळुन आला.

त्यास ओमिनी मालक अमृत सुपडू वाघ (रा. एस.आर.पाटील हायस्कुल समोर, इंदीरा नगर, धुळे) याच्यासह ताब्यात घेण्यात आले. तसेच गिरीष चौधरी याच्या घराची झडती घेतली असता, घरात 20 भरलेले व 18 रिकामे भारत गॅस कंपनीचे सिलेंडर मिळुन आले. प्रदीप सुर्यवंशी याच्याकडे विचारपुस केली असता त्याने सदर व्यवसाय गिरीष ऊर्फ बबलु पांडुरंग चौधरी याचा असुन जप्त करण्यात आलेले गॅस सिलेंडर हरी ओम गॅस एजन्सी (लामकानी ता. धुळे) येथुन पुरविण्यात आल्याचे सांगितले.

प्रदीप सुर्यवंशी याच्या ताब्यातुन 1 लाख 35 हजार रुपये किंमतीचे भारत गॅस कंपनीचे एकुण 38 गॅस सिलेंडर, 1 लाखाची ओमिनी कार व 15 हजार रुपये किंमतीचे गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणारे इले. मोटार, वजनकाटा, नोझल असा एकुण 2 लाख 50 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी प्रदीप रुपचंद सुर्यवंशी (वय 49 रा.विष्णु नगर), व्हॅन चालक अमृत सुपडू वाघ (वय 43 रा.एस.आर.पाटील हायस्कुल समोर, इंदीरा नगर, धुळे), मालक गिरीष ऊर्फ बबलु पांडुरंग चौधरी, हरी ओम गॅस एजन्सीचा मालक यांच्याविरुध्द देवपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, पोसई योगेश राऊत, पोहेकॉ संदीप सरग, योगेश चव्हाण, पोकॉ कमलेश सुर्यवंशी, राहुल गिरी, देवेंद्र ठाकुर, जगदीश सुर्यवंशी, कैलास महाजन यांनी केली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या