Monday, November 25, 2024
Homeधुळेपोल्ट्री फार्म मधील बनावट दारुच्या कारखान्यावर एलसीबीचा छापा

पोल्ट्री फार्म मधील बनावट दारुच्या कारखान्यावर एलसीबीचा छापा

धुळे – प्रतिनिधी dhule

शेतातील पोल्ट्री फार्म (Poultry farm) मध्ये सुरू असलेल्या बनावट देशी दारुच्या कारखान्यावर एलसीबीच्या (lcb police) पथकाने छापा टाकत कारवाई केली. शहरात मुंबई-आग्रा महामार्गालगत (Mumbai-Agra Highway) असलेल्या नालंदा हॉटेलच्या शेजारील शेतात हा कारखाना सुरू होता. घटनास्थळाहून दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून याप्रकरणी चौघांविरुध्द आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

एक शून्य जास्तीचा पडला अन्‌….!

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दि.१३ मे रोजी दुपारी ही कारवाई केली. शहरातील रिध्दीसिध्दी मंगल कार्यालय नालंदा हॉटेलच्या शेजारी असलेल्या शेतातील पोल्ट्री फार्मवर पथकाने अचानक छापा टाकला. तेथे विनोद रामचंद्र गाबडा (वय ६६ रा.मिशन कंपाऊंड, मोगलाई,साक्री रोड धुळे), ललित भिकन माळी (वय १९ रा.देविदास कॉलनी जुने धुळे ), दर्शन संजय चौधरी (वय २४ रा.सुपडूआप्पा कॉलनी जुने धुळे) हे तिघे मानवी जिवितास हानीकारक असलेली बनावट देशी दारु बनवितांना रंगेहात सापडले. त्यांच्याकडून दारुसाठा, दारु बनविण्याच्या साहित्यासह एकूण १ लाख ५४ हजार ८१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हा पोल्ट्री फार्म धिरज कैलास माळी (वय २३ रा.प्लॉट नंबर ३५, सुपडूआप्पा कॉलनी जुने धुळे), याच्या मालकीचा असून त्याने तो दर्शन चौधरी यास भाडेतत्वावर दिला होता, असेही चौकशीत निष्पन्न झाले. पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

या प्रकरणी पोकॉ कमलेश सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून आझादनगर पोलीस ठाण्यातचौघांविरुध्द भादंवी कलम ३२८, ४२० सह महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (अ),(क)(ब)(ड)(ई)(फ) ८३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या