Wednesday, July 24, 2024
Homeनगरएलसीबीचे श्रीरामपूर, कोपरगावला हातभट्टीवर छापे

एलसीबीचे श्रीरामपूर, कोपरगावला हातभट्टीवर छापे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

जिल्ह्यातील अवैध विदेशी दारू व गावठी हातभट्टीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापेमारी करून सहा लाख 75 हजार 760 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून नष्ट केला आहे. कोतवाली, कोपरगाव तालुका, श्रीरामपूर शहर, श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीत या कारवाई करण्यात आल्या आहेत.

जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना विदेशी दारू व गावठी हातभट्टीवर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस अंमलदार बाळासाहेब मुळीक, दत्तात्रय हिंगडे, मनोहर गोसावी, भिमराज खर्से, गणेश भिंगारदे, संतोष लोढे, रवींद्र घुंगासे, आकाश काळे, बाबासाहेब गुंजाळ, रणजित जाधव, भाग्यश्री भिटे, ज्योती शिंदे, संभाजी कोतकर यांच्या पथकाने 23 सप्टेंबर रोजी एकाच दिवशी कोतवाली, कोपरगाव तालुका, श्रीरामपूर शहर, श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीत छापेमारी केली. गावठी हातभट्टी दारू, कच्चे रसायन, विदेशी दारू असा सहा लाख 75 हजार 760 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट केला आहे. 15 जणांविरूध्द संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

प्रकाश पार्थनाथ रॉय (रा. नगर), नंदाबाई दादा काळे (रा. सुरेगाव ता. कोपरगाव), राहुल माणिक जाधव (रा. नांदुर ता. राहाता), दिनकर रामनाथ काथे, विष्णू पांडुरंग जाधव (दोघे रा. सरस्वती कॉलनी, वॉर्ड नंबर सात, श्रीरामपूर), मिना शाम पवार (रा. भैरवनाथनगर, श्रीरामपूर), साधना मोहन काळे (रा. सूतगिरणी, श्रीरामपूर), वंदना संतोष काळे (रा. वॉर्ड नंबर दोन, श्रीरामपूर), सुनील अण्णा गवळी (रा. गोपाळवाडा, श्रीरामपूर), शिवाजी प्रकाश परदेशी, उषा प्रभाकर काळे (दोघे रा. सूतगिरणी, श्रीरामपूर), नाज फकिर मोहंमद शेख (रा. ममदापूर, ता. राहाता), कमल गव्हाणे (रा. गोपाळवाडा, श्रीरामपूर), अनिल मच्छिंद्र पवार (रा. खटकळी बेलापूर, श्रीरामपूर), संजय जनार्दन नरवडे (रा. गायकवाड वस्ती, श्रीरामपूर) यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या