Tuesday, September 29, 2026
Homeक्राईमएलसीबीकडून सोनईत गावठी कट्टा व जिवंत काडतूस जप्त

एलसीबीकडून सोनईत गावठी कट्टा व जिवंत काडतूस जप्त

दोघे ताब्यात || 5 जणांवर गुन्हा दाखल

सोनई |वार्ताहर| Sonai

सोनई-खेडले रस्त्यावरील नवनाथनगर परिसरात गावठी कट्टा बाळगणार्‍याला अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी पहाटे ताब्यात घेतले असून 2 लाख एकवीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन आरोपींना ताब्यात घेतले असून तिघे फरार झाले आहेत.

- Advertisement -

अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार बाळासाहेब नागरगोजे, अरुण गांगुर्डे, अशोक लिपणे, विशाल तनपुरे, भगवान धुळे, फुरकान शेख व प्रशांत राठोड हे सोनई परिसरात फिरत असताना सोनई-खेडले रस्त्यावरील नवनाथनगर परिसरात एका इसमाकडे गावठी कट्टा असल्याचे समजले यावरून सदर ठिकाणी शोध घेतला असता पंकज रामदास कोठवळ (वय 22) रा. नवनाथनगर, सोनई याच्याकडे 50 हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा, एक हजार रुपये किमतीचे जिवंत काडतूस, 20 हजार रुपये किमतीचा मोबाईल व सुमारे दीड लाख रुपये किमतीची सुझुकी कंपनीची मोटरसायकल असा एकूण 2 लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल विनापरवाना बेकायदेशीरपणे बाळगताना मिळून आला.

सदरचा कट्टा चार जणांच्या संगनमताने आणल्याचे सांगितले. अशोक हिरामण लिपणे यांच्या फिर्यादीवरून पंकज रामदास कोठवळ, विलास आयनर, कैलास बबन आयनर दोघेही रा. अमळनेर, राजेंद्र सुधाकर जगताप रा. करजगाव, हरिहर उर्फ बंटी औटी रा. वाटापूर या सर्वावर सोनई पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट 3/25,7/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील पंकज कोठवळ व राजेंद्र जगताप या दोघांना ताब्यात घेतले असून बाकी तीन आरोपी फरार झाले आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याचे समजते्. या घटनेचा पुढील तपास सोनई पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : दुष्काळाचे कारण पुढे करत स्वतःचा अजेंडा राबवणे गैर

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भूमिका मांडली आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात...