Friday, November 22, 2024
Homeनाशिकनाशिक आणि दिंडोरी लोकसभेतून आमचे उमेदवार मोठ्या मतांनी निवडून येणार

नाशिक आणि दिंडोरी लोकसभेतून आमचे उमेदवार मोठ्या मतांनी निवडून येणार

महाविकास आघाडीच्या नेत्यांना विश्वास

नाशिक | Nashik

नाशिक लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे आणि दिंडोरी लोकसभेचे उमेदवार भास्कर भगरे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखला केला. यावेळी दोन्ही उमेदवारांनी शहरातील गोल्फ क्लब मैदान, शालीमार, मेनरोड, एमजीरोड, मेहर सिग्नल, जिल्हाधिकारी कार्यालय या परिसरातून भव्य रॅली काढत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. याप्रसंगी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, कॉंग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मविआच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.

- Advertisement -

यावेळी बोलतांना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, उत्तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीची लाट असून या मतदासंघात आमचे उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील. तसेच नाशिक लोकसभेत आमचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्यासमोर महायुतीला उमेदवारच मिळत नाही. त्यामुळे आमची ही जागा निवडून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हे देखील वाचा : नाशिकमध्ये महायुतीत ट्विस्ट; शांतीगिरी महाराजांनी शिंदेंच्या शिवसेनेकडून भरला उमेदवारी अर्ज!

तसेच राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, नाशिक लोकसभेत महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा दरारा असल्याने त्यांच्यासमोर महायुतीला उमेदवार मिळत नाही, अशी खोचक प्रतिक्रिया त्यांनी दिली. तर बाळासाहेब थोरात म्हणाले की, नाशिक आणि दिंडोरी लोकसभेतून देश पातळीवरील इंडिया आघाडी आणि राज्य पातळीवरील महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होतील, असे त्यांनी म्हटले.

शांतीगिरी महाराज महायुतीचे उमेदवार?

नाशिक लोकसभेसाठी आज महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर दुसरीकडे महायुतीचा नाशिकच्या जागेचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नसतांनाच आज उमेदवारी अर्ज भरण्यावेळी नाशिक लोकसभेत मोठा ट्विस्ट निर्माण झाला. नाशिक लोकसभेतून अपक्ष निवडणूक लढविणारे शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) यांनी शिंदेंच्या शिवसेनेकडून (Shinde Shivsena) आपण उमेदवारी अर्ज भरल्याची माहिती माध्यमांशी बोलतांना दिली. तसेच मी शिंदेंच्या शिवसेनेकडून अर्ज भरला असला तरी मला पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म मिळालेला नसून सध्या माझा अर्ज अपक्ष आहे, असे शांतीगिरी महाराजांनी म्हटले आहे. मात्र, शांतीगिरी महाराजांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या नावाने अर्ज भरल्याने तेच महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हे देखील वाचा : Sanjay Raut : “केंद्र सरकारची कांदा निर्यातीची घोषणा म्हणजे निव्वळ…”; संजय राऊतांचा नाशकातून हल्लाबोल

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या