Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रDasara Melava 2023: नागपूरपासून ते भगवानगड अन् पुणे ते मुंबई; दसरा मेळाव्याने...

Dasara Melava 2023: नागपूरपासून ते भगवानगड अन् पुणे ते मुंबई; दसरा मेळाव्याने राज्याचे राजकारण तापणार

मुंबई | Mumbai

आज दसऱ्याचा सण आहे… दसऱ्याच्या दिवशी अवघ्या महाराष्ट्राच्या नजरा या राजधानी मुंबईकडे असतात. कारण दसऱ्याच्या दिवशी शिवसेनेचा मेळावा पार पडतो. दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे. दसऱ्या मेळाव्याच्या दिवशी होणाऱ्या भाषणाकडे संपुर्ण राज्यासह देशाचे लक्ष असते. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेचे दोन दसरा मेळावे पार पडत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होणार आहे. तर मुंबईतील आझाद मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. आजच्या या दोन्ही दसरा मेळाव्यांकडे राज्याचे लक्ष आहे. या मेळाव्यांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

- Advertisement -

यासोबतच, नागपूरपासून ते भगवानगड आणि आता पुण्यातही दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याने, या मेळाव्यांतून नेते मंडळीकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडणार असल्याने हिवाळ्यातच राज्यातील राजकारण तापणार आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकांपासून राज्यातील राजकारणात मोठ्या प्रमाणावर उलथापालथ बघायला मिळाल्या. अगदी कट्टर विरोधक असलेल्यांनी एकमेकांच्या हातात हात दिले आहे. याचमुळे दुखावलेल्या काहींनी आपल्याच स्वकीयांचे हात सोडत दुसऱ्यांची सोबती केली. हे केवळ पक्षापुरते राहले नाही तर अगदी याच राजकारणाने कुटुंबा-कुटुंबामध्येही फूट पाडल्याचे आपण पािहलेले आहे.

या मेळाव्यासाठी राज्यभरातून लोक येणार असल्याने शिवतीर्थावर विशेष व्यवस्था ही करण्यात आली आहे. या ठिकाणी काही मान्यवरांसाठी खुर्च्यांचीही व्यवस्था करण्यात आली असून खुर्च्यांवर शिवसेनेचे नेते उपनेते आणि पदाधिकारी बसतील. तर त्यामागे शिवसैनिकांना बसण्यासाठीची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवसैनिकांसाठी वेगवेगळे विभाग करण्यात आले आहे तर महिलांना ही बसण्यासाठी स्टेजच्या समोर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकांच्या दृष्टीने शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी हा दसरा मेळावा महत्वाचा आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे काय बोलतात याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा आझाद मैदानावर होणार असून सायंकाळी पाच वाजता ते शिवसैनिकांना संबोधित करणार आहे. यावेळी ते उध्दव ठाकरे यांच्यावर कोणते टिकास्र सोडतात याकडे पहावे लागणार आहे. तर उध्दव ठाकरे हे भाजप, एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांचा कसा समाचार घेता हे पाहणे महत्वाचे राहणार आहे.

तर दुसरीकडे दसऱ्याच्या दिवशी सकाळी आठ वाजता राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये आरएसएस संघाचे संचलन होऊन सरसंघचालक मोहन भागवत हे संबोधन करणार आहे. त्यानंतर बीड जिल्ह्यातील सावरगाव येथे भगवान भक्ती गडावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडणार असून, या मेळाव्यातून त्या त्यांच्या मनातील खदखद बोलून दाखवून कुणावर हल्ला करणार हे पहावे लागणार आहे.

पोलिसांचा ताफा सज्ज

मंगळवारी मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी मुंबई पोलीस सुसज्ज झाले आहेत. उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाचा होणारा मेळावा लक्षात घेता मुंबई पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था राहिल याची काळजी घेतली आहे. त्यासाठी पोलिसांनी ६ अपर आयुक्त, १६ पोलीस उपायुक्त, ४५ सहायक पोलीस आयुक्त यांच्यासह २४९३ पोलीस अधिकारी आणि १२,४४९ पोलीस अंमलदार बंदोबस्तसाठी तैनात करण्यात आलेले आहेत.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या