Tuesday, October 22, 2024
HomeराजकीयNilesh Rane : निलेश राणेंंचा अखेर भाजपला रामराम; उद्या 'धनुष्यबाण' हाती घेणार

Nilesh Rane : निलेश राणेंंचा अखेर भाजपला रामराम; उद्या ‘धनुष्यबाण’ हाती घेणार

मुंबई | Mumbai

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केल्यानंतर अनेक घडामोडी राज्यात पाहायला मिळत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचे ज्येष्ठ पुत्र निलेश राणे (Nilesh Rane) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार अशी बातमी गेल्या काही दिवसांपासून समोर येत होती.

- Advertisement -

मात्र आता निलेश राणे यांनी पत्रकार परिषद देत भाजपातून बाहेर पडत, शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती स्वत: दिली आहे. उद्या (२३ ऑक्टोबर) ४ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांच्या उपस्थितीत ते प्रवेश करणार आहेत. आज त्यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आभार मानले. आताची विधानसभा निवडणूक आम्ही युती म्हणून सामोरे जाऊन निवडून येणार असल्याचे राणे म्हणाले.

निलेश राणे बोलताना म्हणाले, मी 2019 ला राणे साहेबांसोबत, नितेश राणेसोबत आणि आमचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी यांना घेऊन आम्ही भारतीय जनता पक्षात आलो. भारतीय जनता पक्षामध्ये आल्यानंतर खूप आदर मिळाला. सगळ्या नेत्यांनी खूप आदर दिला, प्रेम दिला. भारतीय जनता पक्षामध्ये काम करण्याची जी शिस्त आहे ती शिकायला मिळाली. जी जवळून बघितली.

तसेच, सन्माननीय फडणवीस साहेबांनी तर एका लहान भावाप्रमाणे मला सांभाळलं. काही अडचणी आल्या त्यामधून मला बाहेर काढलं. पक्षामध्ये एक स्थान दिलं. तसंच सन्माननीय रविंद्र चव्हाण साहेब असतील त्यांनी एका भावाप्रमाणे मला सांभाळलं. गिरीश महाजन साहेब असतील, सन्माननीय चंद्रकांतदादा पाटील असतील, सन्माननीय मुनगंटीवार साहेब असतील. यांनी देखील लहान भावासारखा सांभाळल.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या