Wednesday, November 20, 2024
Homeब्रेकिंग न्यूजLebanon Pagers Blast:लेबनॉनमध्ये सिरियल ब्लास्ट; खिशात ठेवलेल्या पेजर्समध्ये एकाच वेळी स्फोट

Lebanon Pagers Blast:लेबनॉनमध्ये सिरियल ब्लास्ट; खिशात ठेवलेल्या पेजर्समध्ये एकाच वेळी स्फोट

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
लेबनॉनमध्ये मंगळवारी सिरियल ब्लास्टची घटना घडली आहे. हिजबुल्लाहच्या अतिरिक्यांकडील व काही अधिकाऱ्यांकडील हजारो पेजर्सचे स्फोट झाले. या स्फोटांमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला असून २,८०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. इस्रायलच्या गुप्तचरांनी या पेजर्समध्ये स्फोटके लपवली होती असा आरोप हिजबुल्लाहने केला आहे.अद्याप या स्फोटांप्रकरणी कोणत्याही संघटनेने जबाबदारी घेतलेली नाही. पण हिजबुल्लाने यामागे इस्रायलचा हात असल्याचा आरोप केलाय. पेजरचा स्फोट कसा झाला? एकाच वेळी असे स्फोट कसे घडवून आणले? असे प्रश्न उपस्थित केले जातात.

दुपारी हिजुबल्लाचे अनेक बंडखोर या स्फोटात गंभीर जखमी झाल्याची माहिती लेबनॉनने दिली आहे. हिजबुल्लाहचे सदस्य एकमेकांशी संवाद साधण्यासाठी पेजरचा वापर करत होते आणि त्याच पेजरचा स्फोट घडवून आणल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

लेबनॉनमध्ये या हल्ल्यानंतर एकच खळबळ माजली आहे. या ब्लास्टमध्ये पाच जण ठार झाल्याचे म्हटले जात आहे.अमेरिकेने बंदी घातलेल्या अतिरेकी संघटना हिजबुल्लाह याला टार्गेट करण्यासाठी लेबनॉनची राजधानी बैरुत मध्ये हे ब्लास्ट झाल्याचे म्हटले जात आहे. अमेरिका आणि युरोपीय संघाने हिजबुल्लाहवर बंदी घातलेली आहे. परंतू इराण या अतिरेकी संघटनेचे समर्थन करीत असून त्याला अर्थपुरवठा करीत आहे.

कसा झाला स्फोट?
गाझामध्ये संघर्ष झाल्यानंतर हिजबुल्लाने त्यांच्या दहशतवाद्यांना इस्रायली गुप्तचरांकडून हॅकिंगचा धोका नको म्हणून मोबाईल फोन न वापरण्याचा सल्ला दिला होता. पेजर्स तयार करणाऱ्या किंवा पुरवठा करणाऱ्या ठिकाणीच त्यात बदल करून हे घडवून आणल्याची शंका आहे.

इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादने पेजर बनवणाऱ्या कंपनीला हाताशी धरून या पेजर्समध्ये स्फोटके ठेवली होती. कंपनीने हे पेजर्स हिजबुल्लाहला विकले होत. मंगळवारी या पेजर्सवर एक मेसेज आला आणि हे मेसेज पाहण्यासाठी पेजरचे बटण दाबताच स्फोट झाला, असे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने एका आंतरराष्ट्रीय वृत्तपत्राने दिले आहे. हिजबुल्लाहने काही महिन्यांपूर्वी तैवानमधील एका कंपनीकडून ५,००० पेजर्स खरेदी केले होते. मात्र ह्या पेजर्समध्ये इस्रायलच्या मोसादने बदल केले होते. ते करत असताना त्यांनी या पेजर्समध्ये रिमोट-ट्रिगर यंत्रणेसह सुसज्ज अशी लहान आकाराची स्फोटके ठेवली होती, जी एका मेसेजद्वारे सक्रीय करणे शक्य होते.

इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादने हा हल्ला घडवून आणला की त्यांनी पेजर बनवणाऱ्या कंपनीशी साटेलोटे करून अथवा एखादे नवे तंत्रज्ञान विकसित करून हिजबुल्लाहवर हा हल्ला केला? याबद्दल वेगवेगळे दावे केले जात आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या