Thursday, November 14, 2024
Homeनगरविधानसभेच्या आचारसंहितेमुळे दिवाळीचा शिधा हुकणार?

विधानसभेच्या आचारसंहितेमुळे दिवाळीचा शिधा हुकणार?

आचारसंहितेमुळे होणार अडचण

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

विधानसभेच्या निवडणुकीसाठी चालू आठवड्यात कधीही निवडणूक आचारसंहिता लागू होणार आहे. ही निवडणूक आचारसंहिता नेमकी दिवाळी- पावडा सणाच्या काळात राहणार असल्याने या काळात राज्य सरकारचा आनंदच्या शिधावर विर्झन पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याबाबत पुरवठा विभागाच्या सुत्रांकडे विचारणा केली असता याबाबत अद्याप कोणतीच स्पष्टता नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, आता कुठे गौरी-गणपतीमधील शिध्याचे वाटप झालेले आहे. यामुळे दिवाळी-पाडव्याच्या शिधाबाबत काहीच आदेश नसल्याचे सांगण्यात आले.

- Advertisement -

वेगवेगळ्या अडचणीमुळे यंदा जिल्ह्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना मागील कोट्यातील जून, जुलै, ऑगस्ट अशी तीन महिन्यांची शिल्लक साखर स्वस्त धान्य दुकानांतून वाटप गेल्या पंधारवड्यात करण्यात आले. सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये फक्त अंत्योदय रेशनधारकांना प्रति महिना एक किलो साखर 20 रुपये या सवलतीच्या दारात दिली जाते. यावर्षी जानेवारी ते मार्च अशी तीन महिन्यांची साखर मिळाली होती. त्यानंतर साखर मिळालेली नाही. परंतु यातील वाटप करुन शिल्लक राहिलेली साखर जून, जुलै, ऑगस्ट अशा तीन महिन्यांचे वाटपासह गौरी- गणेश काळातील शिधाही वाटप करण्यात आला.

जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजनेचे 87 हजार 703 रेशनकार्ड असून 3 लाख 89 हजार 172 लाभार्थी आहेत. तर प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांसाठी 6 लाख 54 हजार 544 लाभार्थी असून जिल्ह्यात शिध्यासह मोफत धान्यांचे 29 लाख 36 हजार 707 लाभार्थी आहेत. या सर्वांना साखरेसह आनंदाच्या वाटप करण्यात आले आहे. मात्र, दरवर्षी दिवाळी देण्यात येणारा शिधा यंदा विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे वाटप होणार की नाही, याबाबत स्पष्ट नसल्याने जिल्हा पुरवठा विभाग देखील संभ्रमात आहे. येत्या दोन ते तीन दिवसात विधानसभेसाठी आचासंहिता लागू होण्याची शक्यता असून दिवाळीनंतर विधानसभेसाठी मतदान प्रक्रिया होणार आहे. यामुळे यंदा दिवाळीत मिळणारा आंनदाच्या शिधा मिळणार की नाही, याबाबत संभ्रम आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या