Wednesday, September 30, 2026
HomeनगरAhilyanagar : अहिल्यानगरची जागा कोणाला? राज्य पातळीवर होणार्‍या समीकरणाकडे सर्वांच्या नजरा

Ahilyanagar : अहिल्यानगरची जागा कोणाला? राज्य पातळीवर होणार्‍या समीकरणाकडे सर्वांच्या नजरा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाआधी विधान परिषदेच्या सदस्यसंख्येत भर पडणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 16 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी 18 जून रोजी मतदान तर 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे. यात नगरसह राज्यातील 16 जागांवर निवडणूक होणार. दरम्यान, विधान परिषदेची अहिल्यानगरची जागा कोणाला? महायुतीमधील उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार की ऐनवळी भाजप ही जागा पटकवणार याकडे जिल्ह्यातील मतदारांचे ‘लक्ष’ लागले आहे.

- Advertisement -

दरम्यान, मनी आणि मसल पावर म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात असल्याने या निवडणुकीसाठी उमेदवारी ते विजयाचा गुलाल असा खडतर प्रवास कोण पार करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. गेल्या दोन ते चार वर्षापासून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच न झाल्याने या मतदारसंघामध्ये पूर्वी निवडून आलेल्या आमदारांचा कार्यकाळ संपुष्टात येऊनही विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक रखडली होती. मात्र, नुकतीच केंद्रीय निवडणूक आयोगाने नगरसह राज्यातील 16 जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. यात अहिल्यानगर, सोलापूर, ठाणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड- रत्नागिरी- सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर- गडचिरोली, अमरावती, धाराशिव- लातूर- बीड, परभणी-हिंगोली, छत्रपती संभाजीनगर-जालना या मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे.

दरम्यान, विधान परिषदेची नगरची जागा ही यापूर्वी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने लढवत या ठिकाणी विजय संपादन केलेला आहे. तसेच या मतदारसंघातील या पूर्वीचा निवडणुकीचा निकाल पाहता या ठिकाणी दरवेळी अनपेक्षीत उमेदवारी आणि निकालाची परंपरा कायम राहिलेली आहे. त्याची पुर्नरावृत्ती यंदा होणार की महायुती आणि महाविकास आघाडीत यांच्या थेट लढत होवून संख्याबळानूसार विजय होणार यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, निवडणुकीतील प्रत्येक हालचालीवर मतदारराजा असणार्‍या नगरसेवकांचे लक्ष राहणार असून या निवडणुकीत कोण पॉवर दाखवणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

नगरच्या जागेबाबत अनेक चर्चा आणि तर्क असतांना राज्यातील अन्य मतदारसंघातील जागा ठरल्यानंतर नगरच्या जागेबाबत निर्णय होणार आहे. महायुतीमधील पवार गट ही जागा राखणार की या ठिकाणी भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात राहणार याबाबत खल सुरू आहे. दरम्यान, जिल्ह्यातील नेते विधान परिषद निवडणुकीबाबत गुळणी धरून असून 23 तारखेला केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या दौर्‍यानंतर खर्‍याअर्थाने या निवडणुकीच्या चर्चेची कोंडी फुटणार असल्याचे सांगण्यात आले.

नेत्यांचे वेट अ‍ॅण्ड वॉच
नगर जिल्ह्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीचा इतिहास पाहिल्यास या ठिकाणी स्थानिक नेत्यांची भूमिका महत्वाची ठरलेली आहे. यंदाच्या निवडणुकीत देखील महत्वपूर्ण राहणार असून महायुतील घटक पक्ष असणार्‍या भाजप आणि राष्ट्रवादी पवार गटाच्या भूमिकेवर या निवडणुकीचे चित्र अवलंबून राहणार आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना उध्दव ठाकरे गट या निवडणुकीत या भूमिका घेणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते सध्या वेट अ‍ॅण्ड वॉचच्या भूमिकेत दिसत आहे.

ताज्या बातम्या

Gunratan Sadavarte : “ठाकरे बंधूंनी शपथ घेऊन सांगावे मोर्चा नक्की कशासाठी?”...

0
मुंबई | Mumbai देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार (Dnyanesh Kumar) यांच्या कार्यपद्धतीवर दोन सहआयुक्तांनी नाराजी व्यक्त केली होती, असे वृत्त 'द इंडियन एक्सप्रेस'ने...