Wednesday, May 27, 2026
HomeनगरAhilyanagar : विधान परिषदेची उमेदवारी निष्ठावंतांना- सभापती राम शिंदे

Ahilyanagar : विधान परिषदेची उमेदवारी निष्ठावंतांना- सभापती राम शिंदे

भानुदास बेरड, सत्यजित कदम, वसंत लोढा, डॉ. सुजय विखे इच्छुक, मात्र ऐनवेळी वेगळा निर्णय

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

विधान परिषदेच्या अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपने पक्षातील निष्ठावंतांनाच उमेदवारी दिली पाहिजे. पक्षामध्ये सध्या चौघे इच्छुक आहेत. पण पक्षपातळीवर वेगळा निर्णय होण्याची शक्यता आहे, असल्याचे मत विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

- Advertisement -

येत्या 31 मे रोजी जामखेड तालुक्यातील चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी शिंदे पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, विधान परिषदेच्या अहिल्यानगर जागेबाबत अद्याप महायुतीमध्ये चर्चा सुरू आहे. ही जागा नेमकी कोणाकडे याचा निर्णय झालेला नाही. मात्र, ज्या पक्षाकडे सर्वाधिक मतं आहेत. त्या पक्षाकडे ती जागा हे समिकरण ठरल्यामुळे अहिल्यानगरची जागा भाजपकडे येणार हे मात्र निश्चित आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या या जागेसाठी भाजपमध्ये माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम, वसंत लोढा यांच्यासह माजी खासदार डॉ. सुजय विखे हे इच्छुक आहेत. यापैकी कोणालाही उमेदवारी द्यावा असा आग्रह आहे. मात्र, पक्षाच्या कोअर कमिटीसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वेगळा निर्णय घेतात का हे पाहणे महत्वाचे आहे, असे सांगत सभापती शिंदे म्हणाले की, माजीमंत्री प्राजक्त तनपुरे हे काही पक्षाचे सदस्य नाही. किंवा त्यांनी पक्षाकडे विधान परिषदेच्या उमेदवारीची मागणी केली नाही. त्यामुळे त्याच्या उमेदवारीबद्दल आता या क्षणापर्यंत तरी नाव नसल्याचा दावा त्यांनी केला. माजी खासदार डॉ. सुजय विखे हे देखील निवडणुकीसाठी इच्छुक असून विधापरिषदेला मागच्या दाराने येणे त्यांना आवडते की नाही हे सांगता येणार नाही, असा टोला शिंदे यांनी यावेळी लगावला.

जिल्हा बँकेत बारकाईने लक्ष
जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकांची मुदत संपल्याने सध्या बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. विधानपरिषदेची आचारसंहिता संपल्यानंतर बँकेची निवडणूक लागणार आहे. मी बँकेत लक्ष घालणार असल्याचे यापूर्वी म्हटले होते. म्हणजे केवळ बँकेत नाही तर निवडणुकीमध्ये लक्ष घालणार आहे. नुसते लक्ष नाही तर बारकाईने लक्ष देणार असल्याचे शिंदे म्हणाले.

आ. रोहित पवार आता आंतरराष्ट्रीय नेते
शरद पवार भाजपमध्ये प्रवेश करणार का या प्रश्नाचे उत्तर आमदार रोहित पवार यांनी दिले पाहिजे. आता आजोबांना नातवांचे ऐकावे लागणार का असे दिसते. शरद पवार भाजपमध्ये प्रवेश करणार असतील, तर मी भाजपमध्ये जाणार नाही असे आ. रोहित पवार म्हणाले होते. त्यावर प्रा. शिंदे म्हणाले की, आ. रोहित पवार यांची राजकीय उंची वाढली आहे. त्यामुळे ते आता आंतराष्ट्रीय नेते झाले आहेत.

ताज्या बातम्या

राज्यातील जिल्हा बँकांना ‘सायबर सिक्युरिटी’चा वापर बंधनकारक; सहकार सचिवांचे निर्देश

0
पुणे |प्रतिनिधी| Pune राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या जिल्हा बँकेतील व्यवहार अधिक सुरक्षित व्हावेत, यासाठी राज्य सहकारी बँकेने नवी मुंबईतील वाशी येथे सुसज्ज ‘सायबर सिक्मयुरिटी...