Wednesday, September 30, 2026
HomeनगरLeopard attack : बिबट्याच्या हल्यात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू

Leopard attack : बिबट्याच्या हल्यात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू

अकोले (प्रतिनिधी)

अकोले तालुक्यातील देवठाण गावातील काळे वस्तीवर बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या किसनाबाई रामहरी काळे (वय ५७) यांचे उपचारादरम्यान निधन झाले. शनिवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रविवारी दुपारी देवठाण येथील अमरधाम स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

- Advertisement -

३० मे रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात बिबट्या काळे यांच्या घरात घुसला. घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केलेल्या बिबट्याने किसनाबाई आणि त्यांचा मुलगा वैभव रामहरी काळे (वय २७) यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात किसनाबाई यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर वैभवच्या पाठीवर आणि हाताला जखमा झाल्या. बिबट्याच्या पंज्यामुळे किसनाबाई यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता, ज्यामुळे त्यांना दहा टाके पडले.

रात्रीच्या शांततेत काळे कुटुंबीय झोपलेले असताना दरवाजा तुटल्याचा आवाज ऐकून किसनाबाई उठल्या. त्यांनी बिबट्या पाहताच आरडाओरड केली. त्यांच्या मुलांनी धाव घेत बिबट्याचा हल्ला परतवला. मात्र, हल्ल्यात जखमी झालेल्या किसनाबाई आणि वैभव यांना तातडीने उपचारासाठी देवठाण प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. नंतर त्यांना नाशिक येथील सिव्हिल रुग्णालयात आणि त्यानंतर अकोले येथील डॉ. भांडकोळी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच शनिवारी रात्री किसनाबाई यांची प्राणज्योत मालवली.

या घटनेनंतर बिबट्या घरातील एका खोलीत दोन तास लपून बसला होता. नंतर तो तिथून पळून गेला. घटनेची माहिती मिळताच गावचे माजी सरपंच अरुण शेळके यांनी वनविभागाला कळवले. वनविभागाचे अधिकारी धिंदळे आणि त्यांचे सहकारी अर्ध्या तासात घटनास्थळी पोहोचले. त्यांनी परिसराची पाहणी करून जखमींना तातडीने वैद्यकीय मदत मिळवून दिली.

 

 

ताज्या बातम्या

Crime News : दरोड्याच्या तयारीत तिघे जेरबंद; दोघे पसार

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अहिल्यानगर-मनमाड महामार्गावरील बोल्हेगाव फाट्याजवळील आराध्या पेट्रोलपंपाच्या पाठीमागे, हॉटेल बजरंगच्या बाजूला दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून गावठी कट्टा,...