Friday, June 21, 2024
Homeनगरदेवळाली प्रवरा येथे बिबट्याच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

देवळाली प्रवरा येथे बिबट्याच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

देवळाली प्रवरा |वार्ताहर|Deolali Pravara

- Advertisement -

देवळाली प्रवरा येथील नगरपरिषद कर्मचारी अरुण कदम यांच्या मोटारसायकलला बिबट्याने धडक देऊन हल्ला केला. यात नगरपरिषद कर्मचारी कदम हे जखमी झाले आहेत. कदम यांचा हाताला व पायाला मार लागला आहे. या घटनेमुळे परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे.

देवळाली नगरपरिषद कर्मचारी अरुण कदम हे देवळाली प्रवरा शहरातून कदम वस्ती येथे आपल्या घरी रात्री 8 वाजेच्या सुमारास जात असताना एक बिबट्या कदम यांच्या दुचाकीला आडवा गेला तर दुसर्‍या बिबट्याने मोटारसायकलला धडक दिली. या धडकेत कदम हे जागेवर खाली पडले. या घटनेत त्यांचा हात फ्रॅक्चर झाला तर पायाला मार लागला असून बिबट्याने नख्या ओरखडल्या आहेत. त्यांच्यावर राहुरी फॅक्टरी येथील विवेकानंद नर्सिग होम येथे उपचार करण्यात आले.

दरम्यान देवळाली प्रवरा येथील कदम वस्तीकडे जाणार्‍या मार्गावर सातत्याने बिबट्याचे दर्शन होत असते या भागात उसाचे क्षेत्र जास्त असल्याने बिबट्याची संख्या जास्त असण्याची शक्यता असल्याने वनविभागाने दखल देऊन तातडीने पिंजरे बसवावेत अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या