Monday, October 5, 2026
HomeनगरParner : बिबट्याच्या हल्ल्यात वृद्धेचा मृत्यू

Parner : बिबट्याच्या हल्ल्यात वृद्धेचा मृत्यू

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

तालुक्यातील किन्ही परिसरात मंगळवारी (दि. 2) दुपारी सुमारे चारच्या सुमारास शेतात काम करत असताना बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. मृत महिलेचे नाव भागूबाई विश्वनाथ खोडदे (वय 70, रा. किन्ही, ता. पारनेर) असे आहे.

- Advertisement -

प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, भागूबाई खोडदे या शेतात नेहमीप्रमाणे एकट्याच काम करत असताना बिबट्याने अचानक झडप घातली. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ग्रामस्थांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्या जंगलाकडे पळून गेला.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करण्यात आला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पारनेर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.

याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान,गेल्या काही महिन्यांपासून किन्ही परिसरात बिबट्यांचा वावर वाढल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. यापूर्वीही जनावरांवर हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. वारंवार होत असलेल्या हल्ल्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बिबट्या जेरबंद करण्याची मागणी
घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी बिबट्याला तात्काळ पिंजरा लावून पकडण्याची मागणी वन विभागाकडे केली आहे. महिला, मुले आणि शेतकर्‍यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. किन्ही परिसरात वाढत्या वन्यजीव हालचालीमुळे ग्रामीण भागातील सुरक्षितता पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. पुढील काही दिवसांत वन विभाग कोणती ठोस पावले उचलतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

Crime News : आई-वडिलांकडून मुलाचा खून, मृतदेह शेतात नेऊन जाळला

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar दारूच्या व्यसनावरून झालेल्या वादात आई-वडिलांनी मुलाला दांडक्याने मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर उपचार न करता घरातच ठेवल्यानंतर दोन दिवसांनी त्याचा...