Tuesday, March 25, 2025
Homeनाशिकदुचाकीस्वारांवर बिबट्याचा हल्ला; दोन जण जखमी

दुचाकीस्वारांवर बिबट्याचा हल्ला; दोन जण जखमी

दिंडोरी | प्रतिनिधी Dindori

- Advertisement -

दिंडोरी तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याने धुमाकूळ घातला असून रस्त्याने जाणाऱ्या दोन दुचाकी स्वारांवर बिबट्याने हल्ला केला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. याच परिसरात दुसऱ्यांदा हल्ला झाल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. सदर बिबट्याचा त्वरित बंदोबस्त व्हावा, अशी मागणी परिसरातून होत आहे.

सविस्तर वृत्त असे की, शनिवार १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० च्या सुमारास निळवंडी -मडकीजांब- जांबुटके रस्त्यावरील जांबुटके शिवारात मोटारसायकलवर घरी जात असताना बाजीराव तुकाराम पाटील राहणार – निळवंडी (ता.दिंडोरी ) आणि सुभाष श्रीराम अपसुंदे राहणार – जांबुटके यांच्यावर बिबट्याने सायंकाळी ७.०० ते ७.३० वाजता वाजेच्या दरम्यान घरी येतं असंताना बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. त्यांमध्ये दोघेही किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने कोणतीही गंभीर दुखापत झाली नसून संबंधितांवर ग्रामीण रुग्णालय दिंडोरी येथे प्राथमिक उपचार करण्यात आले आहे.

मागील काही दिवसांपूर्वी देखील एका इसमावर याच परिसरात बिबट्याने हल्ला केला होता. पुन्हा एकदा बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पससले आहे.‌ या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी परिसरातून होत आहे. अधिक तपास वनपरिक्षेत्राधिकारी सुशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभाग करीत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...