संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner
तालुक्यातील चंदनापुरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात (Leopard Attack) मेंढपाळ गंभीर जखमी (Shepherd Injured) झाल्याची घटना गुरुवारी (दि.6) मध्यरात्रीनंतर एक ते दोन वाजेच्या सुमारास घडली आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर बिबट्याला जेरबंद (Leopard Attack) करण्यासाठी वन विभागाने तातडीने परिसरात दोन पिंजरे लावले आहे. याबाबतची अधिक माहिती अशी, की चंदनापुरी गावांतर्गत असलेल्या कारवस्ती येथे मेंढपाळ चंदू पुंजा दुधवडे व त्यांची पत्नी नंदा दुधवडे गुरुवारी रात्री मुक्कामी होते. पहाटेच्या वेळी बिबट्याने वाघुरीत घुसून मेंढ्यांवर हल्ला केला. त्यामुळे चंदू व त्यांची पत्नी नंदा हे दोघेजण झोपेतून जागे झाले.
यावेळी चंदू हे जवळ गेले असता बिबट्याने थेट त्यांच्यावरही हल्ला (Attack) केला. हल्ल्यात चंदू दुधवडे यांच्या दोन्ही हातांना गंभीर जखमा झाल्या. दुधवडे यांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने धूम ठोकली. आजूबाजूच्या शेतकर्यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली आणि चंदू दुधवडे यांना औषधोपचारांसाठी संगमनेर (Sangamner) येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.
सदर बिबट्याच्या हल्ल्याची माहिती समजताच दुसर्या दिवशी दवाखान्यात जावून वनपाल नामदेव ताजणे, वनरक्षक विक्रांत बुरांडे यांनी भेट देत विचारपूस केली. दरम्यान बिबट्याच्या दहशतीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर बिबट्याला (Leopard) जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावण्याची मागणी शेतकर्यांनी केली होती. यामुळे वन विभागाने (Forest Department) तातडीने परिसरात दोन पिंजरे (Cage) लावले आहे. यापूर्वी देखील चंदनापुरी (Chandanapuri) परिसरासह आदी गावांमध्ये सातत्याने बिबट्याच्या हल्ल्याच्या (Leopard Attack) घटना घडल्या आहेत. आत्तापर्यंत हिवरगाव पावसा व चंदनापुरी या दोन्ही गावांच्या सरहद्दीवर मोठ्या प्रमाणात बिबटे जेरबंद झाले आहे. आता पुन्हा बिबट्याने धुमाकूळ घातला आहे.