रांजणखोल |वार्ताहर| Rajankhol
राहाता (Rahata) तालुक्यातील धनगरवाडी दिघी शिवारात असलेल्या दत्त मंदिर येथे बिबट्याच्या हल्ल्यात (Leopard Attack) सात वर्षीय चिमुकलीचा मृत्यू (Minor Girl Death) झाला असून धनगरवाडीसह वाकडी, दिघी या परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले. या परिसरात लवकरात पिंजरा (Cage) लावून बिबटया जेरबंद (Leopard Arrested) करण्यात यावा अशी मागणी धनगरवाडी, वाकडी येथील संतप्त नागरिकांनी केली आहे.
वाकडी-दिघी रस्त्यावरील धनगरवाडी येथे संतोष राशिनकर यांच्या वस्तीजवळ रात्री नऊच्या सुमारास दबा धरून बसलेला बिबट्याने (Leopard) संतोष राशिनकर यांची चिमुकली मुलगी स्नेहल संतोष राशिनकर (वय ७) हिला घरासमोर असलेल्या पाण्याच्या टाकी जवळून मानेला जबड्यात पकडून शंभर ते दीडसे फूट फरफटत नेले. त्यानंतर त्या परिसरात आरडाओरड झाल्याने मुलीला सोडून बिबट्या पळून गेला. त्यानंतर त्या मुलीला प्रवरा हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. धनगरवाडीचे उपसरपंच साहेबराव आदमाने यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली असता, रात्री अधिकारी संतोष राशिनकर यांच्या वस्तीवर येऊन वन विभागाचे अधिकारी श्री सानप, साखरे, बर्डे, सुराशे यांनी घटनास्थळी पंचनामा केला.
याआधी या घटनेच्या अंतरापासून तीन ते चार किलोमीटरवर चितळी शिवारात एका चिमुकलीचा बळी बिबट्याने घेतला होता. या घटनेने वाकडी, धनगरवाडी, चितळी शिवारातील ग्रामस्थ वन विभागवर (Forest Department) तीव्र संतप्त झाले असून या परिसरात लवकरात लवकर पिंजरा (Cage) लावण्यात यावा व वन खात्याने दक्षता घ्यावी असे नागरिकांनी म्हटले आहे.