Tuesday, April 29, 2025
Homeनगरसंगमनेर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी

संगमनेर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

तालुक्यात बिबट्यांचे हल्ले (Leopard Attack) सुरूच असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे. सोमवारी (दि. 26 ऑगस्ट) पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास वडगाव लांडगा येथे कोपीत झोपलेल्या महिलेवर बिबट्याने (Leopard) अचानक हल्ला करुन जखमी केल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, वन विभागाने (Forest Department) बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी तत्काळ पिंजरा लावला आहे.

- Advertisement -

याबाबत वन विभागाकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की मेंढ्या चारण्यासाठी जांभुळवाडी येथील खेमनर कुटुंबीय वडगाव लांडगा परिसरात आलेले आहे. दरम्यान, मेंढ्या चारुन आल्यानंतर नेहमीप्रमाणे कोपीमध्ये शारदा राहुल खेमनर (वय 35) झोपी गेलेल्या होत्या. पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास दबा धरुन बसलेल्या बिबट्याने (Leopard) अचानक त्यांच्यावर हल्ला करत उजव्या गालावर चावा घेत जखमी (Injured) केले आहे.

या घटनेची माहिती स्थानिकांनी वनपरिक्षेत्र भाग 2 चे अधिकारी सागर केदारे यांना दिली. त्यांनी तत्काळ कर्मचार्‍यांना घटनास्थळी पाठवले. त्यानंतर जखमी महिलेला घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी भयभीत झाल्याने वन विभागाने (Forest Department) तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राजूरमध्ये आरोग्य विभाग अलर्ट मोडवर!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अकोले तालुक्यातील राजूर गावात दूषित पाण्यामुळे काविळसह जलजन्य आजारांचा उद्रेक झाला असून या ठिकाणी आरोग्य विभागाकडून 35 पथके तैनात करण्यात आली आहेत....