संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
तालुक्यातील अकलापूर गावांतर्गत असलेल्या गाढवलोळी येथे सोमवारी (दि.26) दुपारी बिबट्याच्या हल्ल्यात (Leopard Attack) एकोणावीस वर्षीय तरुण गंभीर जखमी (Injured) झाला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी आहे की, गोविंदा दुधवडे हा तरुण (Youth) दुपारी घरापासून काही अंतरावर शेळ्या चारत होता. त्याच दरम्यान, त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप मारली. यावेळी त्याच्या डोक्याला आणि पोटाच्या खाली गंभीर जखमा झाल्या आहेत.
यानंतर त्याला तातडीने घारगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात (Primary Health Centre) हलविण्यात आले. तेथून पुढील उपचारांसाठी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, वन विभागाने (Forest Department) पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करावे, अशी मागणी तेथील नागरिकांनी केली आहे.