Friday, May 3, 2024
Homeनाशिकनाशकात बिबट्याची ‘चिकन पार्टी’

नाशकात बिबट्याची ‘चिकन पार्टी’

ओझे | वार्ताहर | Oze

दिंडोरी तालुक्यातील (Dindori) खेडले (Khedle) गावात रात्री दोन वाजेच्या सुमारास बिबट्याने (Leopard) प्रवेश केला…

- Advertisement -

खेडले ग्रामपंचायतीचे शिपाई झामरू धर्मा माळेकर यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या चार कोंबड्यांवर (Chicken) बिबट्याने हल्ला (Attack) केला. बिबट्याने दोन कोंबड्या फस्त केल्या तर दोन कोंबड्या घरासमोर मृतावस्थेत सोडून बिबट्या तेथून पसार झाला….

बिबट्याने गावात प्रवेश केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील गावांमध्ये अनेक आदिवासी बाधवांच्या शेळ्या घराबाहेर बांधण्यात येतात. त्यामुळे पाळीव प्राण्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या परिसरातील खेडले, करंजवण, ओझे, म्हेळूस्के, लखमापूर येथील परिसरात बिबट्यांचे वास्तव्य कायम आहे. तसेच यापूर्वीही बिबट्याने अनेक पाळीव प्राण्यांवर हल्ले केल्याची घटना घडली आहे.

यासाठी खेडले येथील ग्रामपंचायत व नागरिकांकडून गावात वनविभागाने (Forest Department) त्वरित पिंजरा लावावा, अशी मागणी होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या