Saturday, September 21, 2024
Homeनगरशेतात पाणी द्यायला गेले अन् समोर दिसले बिबट्याचे बछडे; पुढे असं घडलं...

शेतात पाणी द्यायला गेले अन् समोर दिसले बिबट्याचे बछडे; पुढे असं घडलं की…

सोनेवाडी ( वार्ताहर)

- Advertisement -

कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपूर येथे रविवारी दहा वाजेच्या दरम्यान शेतात शेतकरी पाणी भरण्यासाठी गेले असता त्यांना बिबट्याचे बछडे आढळून आले. बिबट्याचे पिल्लू असल्याने त्यांनी आजूबाजूला पाहिले मात्र प्रसंगावधान राखत त्यांनी ही माहिती सरपंच साधनाताई दवंगे व डॉ अनिल दवंगे यांना दिली.

डॉ अनिल दवंगे यांनी वन विभागाची संपर्क साधत बिबट्याचे बछडे सापडले असल्याची माहिती वनविभागाला दिली. गेल्या अनेक दिवसापासून मुर्शतपूर परिसरात बिबट्याचा वावर असल्याने शेतकरी भयभीत होते. मात्र अचानक बिबट्याचे बछडे आढळून आल्याने परिसरात बिबट्या असल्याची खात्री पटली आहे.

MBBS ची विद्यार्थिनी सदिच्छा साने बेपत्ता प्रकरणाचं गूढ उकललं! जीवरक्षकानंच घेतला जीव

नानासाहेब संपत शिंदे त्यांच्या शेतात सर्वे नंबर 67 मध्ये हे पिल्लू आढळून आले. हिरालाल शिंदे, शांतीलाल शिंदे, कैलास शिंदे, राहुल उगले यांनी या पिल्लाला ताब्यात घेण्यासाठी आजूबाजूला असलेल्या शेतकऱ्याला आवाज दिला असता विष्णूआबा शिंदे, जालिंदर शिंदे, सुनील दवंगे, काका शिंदे, सुनील घुले, दत्तात्रेय चौधरी, मोरे, सचिन वढने, माणिक शिंदे,जालु शिंदे यांनी बिबट्याचे पिल्लू पकडण्यास मदत केली.

वन विभागाच्या अधिकारी प्रतिभा सोनवणे यांना वनविभागाचे कर्मचारी जाधव यांनी भ्रमणध्वनी द्वारे हे बिबट्याचे पिल्लू असल्याची माहिती दिली. शेतकऱ्यांनी पकडलेले पिल्लू पुन्हा शेतात सोडले जाणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. आईची आणि पिल्लाची ताटातून होऊ नये म्हणून हा निर्णय घ्यावा लागतो असे त्यांनी सांगितले.

सुसंस्कृत पुण्यात चाललंय तरी काय? पुत्रप्राप्तीसाठी महिलेला खाऊ घातली मानवी हाडांची राख

मात्र शेतकरी धास्तावले असून या परिसरात अजूनही दोन बछडे व मादीसह नर असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले‌ आहे. या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने तात्काळ पाईन परिसरात पिंजरा लावावा अशी मागणी काळे कारखान्याचे माजी संचालक हरिभाऊ शिंदे, टीडीपीचे संचालक रामदास शिंदे व विष्णू शिंदे यांनी केली आहे.

राजधानी पुन्हा हादरली! मद्यधुंद तरूणांनी तरुणीला ४ किमी फरफटवलं; हाडं तुटली, कपडे गळून गेलेधक्कादायक! WhatsApp ग्रुपमधून काढल्याचा राग, अ‍ॅडमिनची थेट जीभचं कापलीसमृद्धी महामार्ग की अपघातांचा रनवे! खासगी बस उलटली; एकाचा मृत्यू, २० जण जखमी

- Advertisment -

ताज्या बातम्या