Saturday, May 30, 2026
HomeनाशिकNashik News: जय भवानी रोडवर बिबट्या अखेर जेरबंद

Nashik News: जय भवानी रोडवर बिबट्या अखेर जेरबंद

नाशिक रोड | प्रतिनिधी
येथील जय भवानी रोडवर असलेल्या चव्हाण मळा पाटोळे मळा मनोहर गार्डन या परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे. यामुळे येथील नागरिकांनी सुटकेचा मोठा निश्वास सोडला आहे. सदरचा बिबट्या हा चव्हाण मळा परिसरात लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात मध्यरात्री मध्यरात्री जेरबंद झाला आहे.

- Advertisement -

जय भवानी रोडवर असलेल्या चव्हाण माळा पाटोळे मळा व मनोहर गार्डन या परिसरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बिबट्याचे दर्शन होत आहे. एकाच वेळी एक किंवा दोन दोन बिबटे नागरिकांना दिसत होते त्यामुळे या भागातील नागरिक भयभीत झाले होते, तसेच बिबट्याला जेरबंद करण्यात यावे म्हणून गेल्या आठवड्यात शनिवारी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या योगिता गायकवाड, सागर निकाळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. तर शिंदे गटाचे विक्रम कदम यांनी सुद्धा बिबट्याला जेरबंद करावे म्हणून वनविभागाकडे सातत्याने मागणी केली होती.

दरम्यान बिबट्या गुरुवारी मध्ये रात्री पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

या भागात अजूनही बिबटे असून त्यांना जेरबंद करण्यासाठी वनविभागाने रेस्क्यू ऑपरेशन राबवावे
योगिता गायकवाड शिवसेना ठाकरे गट युवती सेना जिल्हा विस्तारक

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

संपादकीय : ३० मे २०२६ – आता पाण्याचा हिशोब लागणार!

0
'पाणी हेच जीवन’ हे घोषवाय आपण वर्षानुवर्षे फक्त ऐकत आणि वाचत आलो आहोत; परंतु त्याचा गांभीर्याने विचार आपण कधी केलाच नाही. पाण्याचा बेसुमार आणि...