Wednesday, February 4, 2026
HomeनाशिकNashik News: पेठच्या उस्थळे परिसरात बिबट्या जेरबंद

Nashik News: पेठच्या उस्थळे परिसरात बिबट्या जेरबंद

पेठ | वार्ताहर
गेल्या अनेक दिवसांपासून उस्थळेसह परिसरात बिबट्याने धुमाकुळ घातला होता. परिसरातील शेतात बिबट्याचे दर्श झाल्याने गावकऱ्यांनी वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली होती. त्यानुसार वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अखेर वनविभागाने हा बिबट्या जेरबंद झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, उस्थळे परिसरात बिबट्या अनेकांना दिसल्याचे नागरिकांनी वनविभागाले कळवले होते. वनकर्मचारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून बिबट्याचा वावर असल्याची खात्री केली. या परिसरात पिंजरा लावण्याची ग्रामस्थांनी मागणी केल्यानंतर वनविभागाने बुधवारी सायंकाळच्या सुमारास स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पिंजरा लावला. गुरुवारी पहाटेच्या सुमारास साधारण ३ वर्ष वयाचा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याचे समजले.

- Advertisement -

उस्थळे परिसरात मागील महिन्या भरापासून बिबट्याचा वावर असल्याने वनविभागाच्या वतीने बिबट व मानव संघर्ष व बचाव याबाबत जनजागृती कार्यकम घेऊन नागरिकांना सतर्क केले होते. अधिकारी योगेश साळवे यांचे मार्गदर्शना खाली वनरक्षक तानाजी भोये , मझहर शेख , दिलशान पठाण , भरत चौधरी , कुसूम गवळी यांच्या सह स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला रेस्क्यू करण्यात आले.

YouTube video player

या आधी बिबट्याने जामुनकाळ, बर्डापाडा येथील नागरिकांच्या गाय, शेळ्यांवर हल्ला करुन फस्त केल्याने परिसरातील नागरीकांनी ही बाब वनविभागाच्या निर्दशनास आणून दिली. या भागातून शाळेत जाणाऱ्या लहान मुलांच्या चिंतेने वनविभागाने या परिसरात पिंजरा लावण्यासाठी दबाव वाढल्याने याची दखल घेत वनविभागाने पिंजरा लावला. ज्यात हा बिबट्या जेरबंद झाला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Shirdi : शिर्डीत भाविकांची लूट करणार्‍या एजंटांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi साईनगरीत दर्शनासाठी येणार्‍या लाखो भाविकांची (Devotee) अडवणूक करून त्यांची आर्थिक पिळवणूक करणार्‍या एजंटांच्या (Agent) मुसक्या आवळण्यासाठी प्रशासनाने आता कंबर कसली आहे. भाविकांची...