Sunday, May 26, 2024
Homeनाशिकबिबट्याचा बछडा आढळला मृतावस्थेत

बिबट्याचा बछडा आढळला मृतावस्थेत

देवळाली कॅम्प | वार्ताहर | Deolali Camp

येथील मिलिटरी डेअरी फार्म लगत बिबट्याचा (Leopard) बछडा मृत अवस्थेत आढळून आला. बिबट्याच्या बछड्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती…

- Advertisement -

आज सकाळी 11 वाजेदरम्यान हवालदार के. जी. पागी, रामकृष्णन एम सेना पुलिस हे दोघे ड्युटीवर असताना डेअरी फार्मच्या तारकुंपना लगत झुडपात बिबट्याचा बछडा मृत अवस्थेत आढळून आला.

सामाजिक कार्यकर्ते बबन काडेकर, विलास संगमनेरे हे जात असताना त्यांनी मृत बछड्याला बघितले असता वनविभागाशी संपर्क केला. त्यानंतर पागी यांनी वरिष्ठांना माहिती देताच त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळविली.

…अन् कोथिंबीरला जागेवरच मिळाला एकरी दोन लाखांचा भाव

बिट अधिकारी विजय सिग पाटील, वाहनचालक दर्शन देवरे हे घटनास्थळी दाखल होऊन बछड्याची पाहणी केली. बछडा हा साधारण चार महिन्यांचा असून तो नरजातीचा आहे. त्यास अशोक स्तंभ येथे शवविच्छेदन करुन गंगापूर रोप वाटीका येथे अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

सप्तश्रृंगी गड घाटात बस दरीत कोसळली, १८ जखमी

- Advertisment -

ताज्या बातम्या