Thursday, November 7, 2024
Homeनाशिकदुचाकीच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

दुचाकीच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

वावी । वार्ताहर Vavi

- Advertisement -

सिन्नर-शिर्डी महामार्गावर मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास वावीजवळ इलाही बक्ष यांच्या शेताजवळ रस्ता ओलांडणार्‍या बिबट्यास भरधाव दुचाकीची धडक बसल्याने बिबट्या ठार झाला तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.

अजीज शेख हे दुचाकीस्वार पल्सरहून शहापूरकडे जात होता. समोरुन अचानक बिबट्या महामार्ग ओलांडताना दिसला. मात्र, दुचाकी वेगात असल्याने नियंत्रणात येईपर्यंत दुचाकी बिबट्याला धडकली. बिबट्याजवळच जखमी होवून पडला तर 100 फुट अंतर दुचाकी घसरत गेल्याने शेख जखमी झाले.

अजित देसाई, राम सुरसे यांनी तेथून जाताना हा अपघात पाहून वावी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक गणेश शिंदे यांना माहिती दिली. हवालदार देवीदास माळी, विक्रम लगड, विक्रम टिळे अपघातस्थळी दाखल झाले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पिंपरवाडी टोलनाक्यावरील व्यवस्थापक तेजस वलवे यांनी जखमी तरुण व बिबट्यावर उपचारासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या. उपवनपरिक्षेत्र अधिकारी अनिल साळवे यांनी बिबट्याला ताब्यात घेतले. उपचारासाठी नाशिक येथे नेत असतानाच या बिबट्याचा मृत्यू झाला.

सिन्नर येथील मोहदरी वनोद्यानात वनविभागाचे पशु वैद्यकीय अधिकारी पी. व्ही. चत्तर यांनी शवविच्छेदन केले. तेथेच बिबट्याला अग्नीडाग देण्यात आला. बिबट्याला अपघातात डोक्याला गंभीर मार लागला होता व रक्तस्त्रावामुळे बिबट्याचा मृत्यू झाल्याची नोंद शवविच्छेदन अहवालात करण्यात आली आहे. मृत बिबट्या चार वर्ष वयाचा नर होता. वनविभागाकडून पुढील तपास केला जात आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या