Saturday, July 27, 2024
Homeनगरलोणीत महसुलमंत्र्यांच्या शेतात बिबट्या जेरबंद

लोणीत महसुलमंत्र्यांच्या शेतात बिबट्या जेरबंद

लोणी । वार्ताहर

राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे शुक्रवारी महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाथरे रस्त्यावरील शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. लोणी परिसरामध्ये गेल्या आठ-दहा वर्षात बिबट्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. आतापर्यंत पंधरा पेक्षा अधिक बिबटे जेरबंद झाले आहेत. महसूलमंत्री विखे पाटील यांच्या शेतात जेरबंद झालेला हा चौथा बिबट्या आहे. रानडुकरे, मोर, ससे आणि बिबटे यांच्या त्रासामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.

- Advertisement -

ना.विखे यांच्या शेतात अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचे दिसून आले होते.या भागात मोठी लोकवस्ती असल्याने वनविभागाने काही दिवसांपूर्वी पिंजरा लावला होता. शुक्रवारी मध्यरात्रीच्यावेळी भक्ष्याच्या शोधत असलेला बिबट्या अलगद पिंजऱ्यात अडकला.त्याने टोहो फोडल्याने आजूबाजूच्या लोकांना जाग आली.मात्र तो अंधारात पिंजऱ्यापर्यंत जाण्याचे धाडस कुणी केले नाही. सकाळी मात्र जेरबंद झालेला बिबट्या बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली.

“…तर सर्वोच्च न्यायालयानेच देश चालवावा”; मणिपूर घटनेवरुन केंद्राची खरडपट्टी काढल्यानं भाजप आमदार संतापले

जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांना माहिती मिळताच त्याही घटनास्थळी पोहचल्या. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाल्यावर तेही लोणीत पोहचले. लोणीत आजपर्यंत जेरबंद झालेल्या बिबट्यामध्ये हा सर्वाधिक वयाचा असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले. पाच ते सहा वर्षे वयाचा हा नर बिबट्या असल्याचे सांगितले. हा बिबट्या घेऊन गेल्यानंतर याच परिसरात आणखी दोन बिबट्यांनी नागरिकांना दर्शन दिल्याने परिसरातील भीतीचे वातावरण कायम आहे.

तक्रार घेऊन आलेल्या महिलेवर पोलीस उपनिरीक्षकाकडूनच अत्याचार, राहुरीमध्ये खळबळ

- Advertisment -

ताज्या बातम्या