Tuesday, September 29, 2026
Homeब्रेकिंग न्यूजधुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद

धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद

लासलगाव | वार्ताहर Lasalgaon

- Advertisement -

लासलगाव पासून सात की. मी . अंतरावरील मरळगोई खुर्द येथील शेतकऱ्यांना तीन ते चार दिवसांपासून हैराण करणारा बिबट्या अखेर वनविभागाच्या जाळ्यात आला आहे. शंकर दरेकर यांच्या द्राक्षबागेत व मक्याच्या शेतात वास्तव्य करून दशहत माजवणाऱ्या या बिबट्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

मागील काही दिवसांपासून गावातील शेतकऱ्यांना रात्री शेतावर जाणे कठीण झाले होते. पाळीव प्राण्यांवर हल्ला होईल या भीतीने शेतकरीही सावध झाले होते. ग्रामस्थांनी याबाबत निफाड वनविभागाकडे तक्रार केली. त्यानंतर वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला पकडण्यासाठी मोहीम सुरू केली.

शुक्रवारी मध्यरात्री बिबट्या शिकार करण्यासाठी बाहेर पडला असता तो थेट पिंजऱ्यात शिरला आणि जेरबंद झाला. आज सकाळी ही बाब समोर आल्यानंतर ग्रामस्थानी सुटकेचा निःश्वास सोडला.

ताज्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय! ‘माजी अग्निवीरांना’ शासकीय नोकरीत १०% आरक्षण, वैरण...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्र सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची अत्यंत महत्त्वाची बैठक आज मुंबईतील मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत राज्यातील युवक, शेतकरी,...