दिंडोरी । प्रतिनिधी Dindori
दिंडोरी शहरासह जाधव वस्ती, निळवंडी, पिंंपळगाव केतकी परिसरात बिबट्याचे दिवसा दर्शन होत असल्याने शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
हे देखील वाचा : Nashik Crime News : सायबर चोरट्यांनी शेअर ट्रेडिंग आणि वर्क फ्रॉमचे आमिष दाखवून ३७ लाख उकळले
दिंडोरी शहरातील जाधव वस्तीवरील भाजप नेते विलास देशमुख यांच्या ऊसाच्या शेतालगत असलेले दत्तू मोरे यांच्या कडे असलेल्या वासरावर बिबट्याने हल्ला करुन ठार केले तर पिंंपळगाव केतकी येथील भाऊसाहेब देशमुख यांच्या ऊसाच्या शेतालगत असलेले मेढ्यांपाळ यांच्या मेढ्यावर हल्ला करुन ठार केले आहे. त्यामुळे शेतकर्यांसह मेढपाळांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
हे देखील वाचा : ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. तारा भवाळकर यांची निवड
याबाबत दिंडोरी नगरपंचायतीचे नगरसेवक नितीन गांगुर्डे यांनी तत्काळ वनविभागाला संपर्क साधला असता वनविभागाने तात्काळ दखल घेऊन वनक्षेत्रपाल अधिकारी पूजा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र मंडळ अधिकारी अशोक काळे, वनरक्षक दळवी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी विष्णू मोरे व मेंढपाळांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यावेळी परिक्षेत्र मंडळ अधिकारी अशोक काळे व वनरक्षक दळवी यांनी शेतकर्यांना बिबट्यापासून कसे प्रकारे बचाव करता येईल, याबाबत मार्गदर्शन केले.
हे देखील वाचा : Nashik Sinnar News : अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार
दिंडोरी शहरालगत असणार्या जाधव वस्ती व पिंगळ वस्ती येथे बिबट्याचा वावर असून अनेकांना बिबट्याने दर्शन दिले आहे. सध्या दिंडोरी शहरात अनेक ठिकाणी शेत मळ्यात बिबटे वास्तव्य करून आहेत. पिंपळगाव केतकी, निळवंडी, जाधव वस्ती व पिंगळ वस्तीवर बिबट्याने ठाण मांडले आहे. गेल्या काही वर्षांपासून या व्यक्तींचा दिवसेंदिवस वावर वाढत असून मागच्या वर्षीही येथील शेतकरी सुनील जाधव यांच्या शेतात वास्तव्यास होता. त्यानंतर हे बिबटे ऊस तोड झाल्यानंतर कोलवण नदी पात्र लागत वास्तव्याला गेले. हे बिबटे आता राज रोज फिरू लागले आहे.
याबाबत नगरसेवक नितीन गांगुर्डे यांनी वनविभागाशी संपर्क साधुन त्वरीत पिंजरा बसविण्याची मागणी केली असता वनविभागाने तत्काळ पिंजरा उपलब्ध करुन जाधव वस्ती येथे पिंजरा बसविण्यात आला आहे तर पिंपळगाव केतकी येथेही लवकरात लवकर पिंजरा बसविण्यात येईल, असे आश्वासन परिक्षेत्र मंडळ अधिकारी अशोक काळे यांनी दिले.