Friday, June 21, 2024
Homeनाशिकनाशिकरोड परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद

नाशिकरोड परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashikroad

- Advertisement -

गेल्या एक ते दीड महिन्यापासून नाशिकरोडच्या भरवस्तीत धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात आज पहाटेच्या सुमारास जय भवानी रोडवर असलेल्या मनोहर गार्डन जवळील सय्यद मळा येथे अखेर जेरबंद झाला आहे. हा बिबट्या जेरबंद झाल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे…

नाशिकरोड परिसरातील भरवस्तीत असलेल्या जय भवानी रोड, आडके नगर, खोले मळा, आनंदनगर या ठिकाणी गेल्या एक ते दीड महिन्यापासून बिबट्याने धुमाकूळ घातला होता. या बिबट्याने एका कुत्र्याला फस्त केले होते. तर आनंदनगर येथील कदम लॉन्ससमोर एका इसमावर हल्ला करून गंभीर जखमी केले होते. त्यामुळे या परिसरात बिबट्याचे दहशत निर्माण झाली होती.

Nashik Rain News : जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी; बळीराजाला दिलासा

सायंकाळी नागरिक लहान मुले व महिला घराबाहेर निघत नव्हते. त्याचप्रमाणे बिबट्या पकडण्यासाठी अनेक वेळा रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले. परंतु बिबट्या सापडत नव्हता. त्याचप्रमाणे ठिकठिकाणी पिंजरा सुद्धा लावण्यात आला होता. हा बिबट्या अनेक वेळा हुलकावणी देत होता. तीन ते चार दिवसापूर्वीच सदरचा बिबट्या हा जय भवानी रोड परिसरात असलेल्या मनोहर गार्डन जवळ नागरिकांना दिसला होता.

शासन आपल्या दारी अभियान : सामजिक अर्थसहाय्य योजनेंतर्गत ‘इतकी’ प्रकरणे मंजूर

त्यानंतर या ठिकाणी पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी वनविभागाकडे केली होती. या मागणीनुसार वनविभागाने जय भवानी रोडवर असलेल्या सय्यद मळा येथे पिंजरा लावला होता. अखेर आज पहाटेच्या सुमारास सदरचा बिबट्या या पिंजऱ्यात जेरबंद झाला. बिबट्या जर बंद झाला असल्याची वार्ता वाऱ्यासारखी परिसरात समजताच बिबट्या बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली.

दरम्यान बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याचे समजल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते रमेश धोंगडे ,प्रताप मेहरोलिया, विक्रम कदम, योगेश देशमुख, योगिता गायकवाड, हिरा कलानी आदिंसह परिसरातील नागरिक यांच्या सहकार्याने तातडीने वनविभागाला ही माहिती कळविली. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी आले व त्यांनी बिबट्याला पिंजऱ्यासह घेऊन गेले.

जेरबंद झालेला बिबट्या हा चार वर्षाचा असल्याचे समजते. दरम्यान या भागात आणखी एक बिबट्या असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. हा बिबट्या जेरबंद झाल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

शेतकर्‍यांसमोर आर्थिक संकट; टोमॅटोसह भाजीपाला दरात मोठी घसरण

- Advertisment -

ताज्या बातम्या