Saturday, May 25, 2024
Homeजळगावभुसावळ : सुनसगाव शिवारात बिबट्याचा वावर

भुसावळ : सुनसगाव शिवारात बिबट्याचा वावर

सुनसगाव, ता. भुसावळ-वार्ताहर-Sunsgaon

येथील शेती शिवारात वन्य प्राण्याच्या पायाची लहान मोठे ठसे दिसल्याने या परिसरात बिबट्या मादी आपल्या बछड्यासह वावरत असल्याची चर्चा सुरू असून वनविभागाने पाहणी करून खुलासा करावा अशी मागणी परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे.

- Advertisement -

गावापासून अर्धा कि.मि.अंतरावरील बारकतारी नामक शेती शिवारात विनायक उत्तम कंकरे यांच्या पेरलेल्या शेतात वन्य प्राणी गेल्याचे लक्षात आले. या ठिकाणी स्पष्टपणे मोठ्या व लहान प्राण्याच्या पायाची ठसे उमटले आहेत. त्यामुळे पिलांसह शेती शिवारात फिरणारा प्राणी कोणता असेल? या बाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता या भागात लांडगे आहेत मात्र लांडगा प्राणी आपल्या पिल्लांना घेऊन फिरत नसल्याचे काही जाणकारांनी सांगितले.

फक्त वाघ मादी आपल्या बछड्यासह वावरत असल्याचे सांगितले जाते त्यामुळे बिबट्या मादी आपल्या बछड्यासह वावरत असेल असे बोलले जात आहे. हे उमटलेले पायाचे ठसे मोठे आहेत त्याच प्रमाणे त्या मोठ्या पायाच्या ठस्यांना लागून लहान ठसे आहेत त्यामुळे बिबट्या मादीच आपल्या बछड्यासह या भागात वावरते की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

याबाबत वनविभागाच्या कर्मचार्‍यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र फोन नॉटरिचेबल आल्याने व रविवारचा दिवस असल्याने संपर्क होऊ शकला नाही.

परिसरात मोठ्या संख्येने वन्य प्राणी या परिसरात तसेच शिवारात मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी आहेत. त्यात हरीण,रानडुक्कर, ससा, निलगाय (लोधडे), लांडगा, कोल्हा या प्राण्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

शेतकरी या प्राण्यांच्या त्रासाने त्रस्त झाले आहेत. त्यात जर बिबट्या सारखे वन्य प्राणी या शिवारात आले तर शेती व्यवसाय संकटात येईल असे बोलले जात आहे. तरी लवकरात लवकर वन विभागाने घटना स्थळी जाऊन चौकशी करून श़ेतकर्‍यांच्या मनातील भिती दूर करावी असे बोलले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या