Tuesday, May 7, 2024
Homeनाशिकअरे बापरे! शेतकऱ्याला बछड्यासह बिबट्याचे दर्शन

अरे बापरे! शेतकऱ्याला बछड्यासह बिबट्याचे दर्शन

ओझे l Oze (वार्ताहर)

दिंडोरी तालुक्यातील ओझे परिसरामध्ये आज सायंकाळी ६.१५ वाजता ओझे येथील तुळशिराम गोजरे यांच्या वस्तीजवळ द्राक्षबागेच्या शेजारी मोकळ्या शेतामध्ये बिबट्याच्या मादीसह बछडे खेळांना आढळून आल्याने एकच धावपळ झाली.

- Advertisement -

सांयकाळी ६ वाजेच्या दरम्यान तुळशिराम गोजरे यांचा मुलगा संदिप गोजरे हा द्राक्षबागेला ट्रॅक्टर पावडर मारत असताना हा प्रकार लक्षात आला.

सदर मादी संदिप यांच्यावर जोरात गुर्रत होती. या प्रकाराने त्यांनी बागेला पावडर मारण्याचे सोडून घराकडे पळ काढला. शेजारी कादवा नदी व मोठ्या प्रमाणात लपंण्यासाठी जागा असल्यामुळे या ठिकाणी बिबट्याचा कायम वावर आहे. या पूर्वीही याच ठिकाणी त्यांच्या वस्तीवर बिबट्या अनेक वेळा येऊन गेला आहे.

ओझे परिसरामध्ये कायमच बिबट्याचा मुक्तसंचार दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शेतकऱ्यांसह शेतमजुरांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या प्रमाणे ओझे परिसरामध्ये चार दिवस रात्री ८ ते सकाळी ६ वाजेपर्यत कृषीपंपाना थ्री फेज विजपुरवठा होत असल्यामुळे शेतक-यांना पिकांना पाणी देण्यासाठी रात्रभर शेतात जावे लागते. त्यामुळे एकीकडे महावितरणचा रात्रीचा विजपुरवठा तर दुसरीकडे रात्री बिबट्यांची भिती यांमुळे शेतकरीवर्ग अतिशय भयभीत असून वनविभागाने मात्र कायमच दुर्लक्ष केले आहे.

ओझे परिसरामध्ये पिंज-यांची मागणी अनेक दिवसापासून असताना वनविभागाने याकडे हेतुपुस्कर दुर्लक्ष करित असल्यांची चर्चा सर्वत्र होत आहे. यासाठी वनविभागाने या ओझे येथे पिंजरा लावण्यात यावा आशी मागणी ओझे येथील शेतकरी संदिप तुळशिराम गोजरे यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या