Saturday, May 4, 2024
HomeUncategorizedबिबट्यांची दहशत कायम

बिबट्यांची दहशत कायम

दिंडोरी | बापू चव्हाण | Dindori

दिंडोरी (dindori) हा तसा धरणांचा व द्राक्ष पंढरी म्हणून ओळखला जातो परंतु आता हा तालुका बिबट्यांचा (Leopards) परिसर असे म्हणण्याची वेळ तालुक्यातील जनतेवर आली आहे. गेल्या कित्येक दिवसांंपासून तालुक्यामध्ये दिवसाढवळ्या बिबट्यांचा (Leopards) वावर आहे. त्यामुळे बिबट्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे.

- Advertisement -

तालुक्यातील शेतकर्‍यांना (farmers) शेती कररताना मजूर मिळत नाही. कारण शेतात कामाला जावे की नाही भिती मजूरांना बिबट्याच्या (Leopards) हल्ल्यांमुळे वाटत आहे. तालुक्यामधील करंंजवण (Karanjwan), ओझे (oze), हातनोरे, लखमापूर, म्हेळुस्के निळवंडी, पाडे, निगडोळ, चाचडगाव परमोरी, वरखेडा, धागूर ,उमराळे राशेगाव, पिंपळनारे, शिंदवड याशिवाय पूर्व भागातील पिंपळगाव केतकी,

पालखेड, कोराटे, मोहाडी खडक सुकेने, लोखंडेवाडी, जोपुळ, जानोरी, खतवड, दहेगाव, दिंडोरी शहर परिसर आदी ठिकाणी या बिबट्यांचा (Leopards) वावर आहे. अनेक ठिकाणी बिबट्यांनी शेतातील शेतकर्‍यांना (farmers) नागरिक, शाळेतील विद्यार्थ्यांना (students) तसेच मजुरांवर हल्ला केला असून काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे. याशिवाय कुत्रे, गाई, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या, वासरे म्हशी यांना देखील बिबट्यांनी फस्त केले आहे. तर काही ठिकाणी जीव घेणे हल्ले देखील झाले असल्याने तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत अधिकार्‍यांना अनेक वेळा सांगितले मात्र हे अधिकारी घटनास्थळी येऊन पंचनामा (panchanama) करतात त्यानंतर उशिरा मदत मिळत असते अशा अनेक घटना तालुक्यांमध्ये वारंवार घडत आहे. त्यामुळे अधिकार्‍यांवर धावपळ करण्याची वेळ येत आहे कुठे पिंजरा आहे, तर कुठे नाही. काही ठिकाणी पिंजरे लावले असता या बिबट्यांंना पकडण्यात संंबंंधित खात्याला यशही आले आहे.

सोशल मीडियावर (social media) बिबट्यां संचाराचे व्हायरल व्हिडिओ (viral video) पहावयास मिळत असल्याने यामुळेही नागरिकांमध्ये भीती निर्माण होत आहे. संबंधित खात्याकडून अनेक वेळा कारवाई करण्यात येईल असा इशारा देऊनही याचा काहीही उपयोग होत नाही. ही कारवाई कागदावरच राहते त्यामुळे यावर सुद्धा उपाययो योजना करावी असे असले तरी बिबटे मात्र हल्ले करण्याचे थांबत नसल्याने नागरी सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. हे हल्ले कमी करण्यासाठी संबंधित खात्याकडून वनरक्षकांची संख्या व पिंजर्‍यांची संख्या वाढवून ज्या ठिकाणी हल्ले होत आहे अशा ठिकाणी लवकरात लवकर पिंजरे लावावेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या