नांदुरमध्यमेश्वर | वार्ताहर Nandurmadhyameshwar
नांदुरमध्यमेश्वर येथे बिबट्याने दहशतीचे वातावरण केले आहे. दि.26.4.2025 रोजी रात्री 10 ते12 वाजेच्या सुमारास त्रिंबक पुंजाजी दाते यांचे कडील कुत्र्यावर हल्ला करून ठार केले. या मुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहेत.
दिवसभर उष्माघात तीव्रतेनुसार त्यात शेतकरी बांधवांची कांदे काढणीचा लगबग तर काही मजुरांनी रात्रीच्या वेळेस शेतात कांदे काढणे सुरु केले आहेत. त्यात बिबट्याने मोठा धुमाकूळ घातला आहे. याची वनविभागाने दक्षता घेवून बिबट्या जेरबंद करावा अशी मागणी नांदूर मधमेश्वर माजी सरपंच शांताराम दाते, रामदास शिंदे, राजेंद्र डांगले, दत्तात्रय नाईकवाडे, गोरख कांदळकर, दत्तात्रय दाते, मनोज चव्हाणके, एकनाथ नाईकवाडे, दिपक शिंदे. किशोर धुमाळ, राहुल पगारे , नितीन पगारे, सुनिल पगारे, सोमनाथ शिंदे. राजेंद्र बडे , माणिक डांगले, गजेंद्र काळे, समाधान नाईकवाडे, युवराज पगारे, विजय मिंधे, नामदेव मेमाणे, मयुर पगारे, वैभव शिंदे ग्रामस्थांनी केली.
त्या नंतर तत्काळ वनरक्षक विजय दोंदे, वनविभागाचे राहुल घुगे, व बचाव पथकासह घटनास्थळीच भेट देऊन पिंजरा लावण्यात आला. व पाहणी करून बिबट्याचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन दिले. परिसरातील लहान व शाळेतील मुलांची तसेच पाळीव प्राण्यांची काळजी घेण्याची वनरक्षक विजय दोंदे यांनी ग्रामस्थांना सुचना केली आहे.